शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; बेपत्ता १८ मतदारांसाठी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:23 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या डोलार गावात कुणीही राहत नसताना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ते राज्यातील बहुधा सर्वात लहान मतदान केंद्र ठरले आहे. अवघ्या १८ मतदारांसाठी या गावात केंद्र असणार आहे.

ठळक मुद्देमेळघाटातील वास्तव : पुनर्वसन झालेल्या डोलार गावाची सद्यस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या डोलार गावात कुणीही राहत नसताना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ते राज्यातील बहुधा सर्वात लहान मतदान केंद्र ठरले आहे. अवघ्या १८ मतदारांसाठी या गावात केंद्र असणार आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या तालुक्यातील जवळपास १८ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यात अतिदुर्गम डोलार या गावाचासुद्धा समावेश आहे. सन २०१८ मध्ये या गावाचे पुनर्वसन झाले आहे. जवळपास ८० घरांचा समावेश असलेल्या या गावात २३३ मतदार होते. त्यामध्ये १२६ पुरुष आणि १०७ महिलांचा समावेश आहे. पुनर्वसन झाल्याने संपूर्ण गावातील आदिवासींची घरे-झोपड्या बेपत्ता झाल्या असल्या तरी अंगणवाडी व शाळेची इमारत अजूनही जैसे थे आहे. तेथेच लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी करण्यात आली असून शाळेत मतदान केंद्र राहणार आहे. अचलपूर तालुक्यातील वाघडोह येथे १६९, धारणी तालुक्यातील टिटंबा येथे ४२, टिंगऱ्या येथे २, तर धारणी व माळीझडप येथे प्रत्येकी एक मतदाराची नोंद असल्याने तेथे डोलारचे पुनर्वसित मतदान करू शकणार आहेत.१८ मतदार शोधता सापडेनाडोलार गावाचे पुनर्वसनादरम्यान तेथील मतदारांचा समावेश ते नव्याने राहत असलेल्या मतदान केंद्रावर करण्यात आला. परंतु १८ मतदारांचा शोध लागला नाही. त्यांच्यासाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ६१ क्रमांकाचे हे मतदान केंद्र्र असून चार मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, कोतवाल अशी सहा जणांची यंत्रणा या १८ मतदारांसाठी राहणार आहे. हे मतदार डोलार गावात मतदानासाठी आले किंवा नाही, हे मात्र १८ एप्रिल रोजी सायंकाळी कळणार आहे. त्यांचा कायमचा पत्ता घेऊन त्यांना पुढील निवडणुकीत वास्तव्यातील गावात मतदान करता येईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019