अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी २६ मार्चपर्यंत ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी छाननी करण्यात आली. यामध्ये तांत्रिक कारणावरून दोन अर्ज बाद झाल्याने ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शुक्रवारी अर्जांची माघार व चिन्हवाटप असल्याने या दिवशी सायंकाळी ५ वाजता लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.छाननीअंती सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष) व आनंद श्रीराम धवणे (अपक्ष) यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते, उपजिल्हाधिकारी उदय राजपूत आदी उपस्थित होते. ३४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या कोणत्याही सूचकाला वा निवडणूक प्रतिनिधीला २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. १८ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान होणार आहे.यांचे अर्ज पात्रअरुण मोतीरामजी वानखडे (बहुजन समाज पार्टी), आनंदराव अडसूळ (शिवसेना), विनोद मिलिंद गाडे (आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी), गुणवंत सुदामराव देवपारे (वंचित बहुजन आघाडी), नरेंद्र बाबूलाल कठाणे (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), नीलिमा नितीन भटकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), नीलेश आनंदराव पाटील (आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडिया), पंचशीला विजय मोहोड (बहुजन मुक्ती पार्टी), राजू महादेव सोनोने (बहुजन महापार्टी), संजय हिरामणजी आठवले (बहुजन महापार्टी), विजय यशवंत विल्हेकर ( स्वतंत्र भारत पक्ष), सुनील डेव्हिड डोंगरदिवे (बहुजन मुक्ती पार्टी) यांच्यासह अनिल नामदेवराव जामनेकर, अंबादास श्यामराव वानखडे, मीनाक्षी सोमेश्वर कुरवाडे, गाझी सादोद्दीन जहीर अहमद, धनराज किसनराव शेंडे, नवनीत राणा, पंकज लीलाधर मेश्राम, प्रमोद लक्ष्मण मेश्राम, प्रवीण सरोदे, राहुल लक्ष्मणराव मोहोड, रविकिरण देविदास तेलगोटे, राजू नारायण कुºहेकर, राजू बक्षी जामनेकर, राजू श्यामराव मानकर, रावसाहेब पुंडलिक गोंडाणे, रीतेश गुलाबराव गवई, विलास शेषराव थोरात, शैलेंद्र तुकाराम कस्तुरे, श्रीकांत उल्हास रायबोले, सारंग दादाराव ढोके, सिद्धार्थ भास्कर बनसोड, ज्ञानेश्वर काशीराव मानकर या अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम आहेत.
Lok Sabha Election 2019; दोन अर्ज बाद, ३४ कायम; शुक्रवारी अर्जाची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:39 IST