अमरावती : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आनंदराव अडसूळ बिनबुडाचे, खालच्या स्तरातील आरोप करीत आहेत. अडसूळ जे आरोप करीत आहेत, ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार राणा यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आ. रवि राणा व महाआघाडीच्या उमेदवार यांच्यावर मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील पैसा प्रचारात वापरल्याचा आरोप केला होता. आ. राणा यांनी या आरोपाचे खंडन केले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आनंदराव अडसूळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता बिनबुडाचे आरोप करीत आहेत. या आरोपात कुठेही तथ्य नाही, असे राणा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. जिल्ह्याच्या विकासासाठी कुठलाही रस न दाखविता अडसुळांनी अमरावती जिल्ह्यातील एक महिला लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी वेळ खर्ची घातला व आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बिनबुडाचे आरोप करणे सुरू केले आहे. त्यामुळे अडसुळांनी प्रथम जिल्ह्याच्या विकासासाठी बोलावे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करणारे आरोप करू नयेत व लोकशाहीमध्ये एका महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
Lok Sabha Election 2019; अडसुळांनी आरोप सिद्ध करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:10 IST
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आनंदराव अडसूळ बिनबुडाचे, खालच्या स्तरातील आरोप करीत आहेत. अडसूळ जे आरोप करीत आहेत, ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार राणा यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.
Lok Sabha Election 2019; अडसुळांनी आरोप सिद्ध करावे
ठळक मुद्देरवि राणांचे आव्हान : खालच्या पातळीवरील आरोप करू नये