शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Lok Sabha Election 2019; हेल्पलाईनवर ११५८ कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:15 IST

लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांक, मतदान केंद्र शोधताना त्रास होऊ नये, यासाठी पाच महिन्यांपासून टोल फ्री क्रमांकाची सुविधा देण्यात आली. यावर तब्बल ११५८ मतदारांनी संपर्क साधला व शंकांचे निरसन केले.

ठळक मुद्देटोल फ्री क्रमांकाला प्रतिसाद : सी-व्हिजिलला २७; इतर अ‍ॅपवर प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांक, मतदान केंद्र शोधताना त्रास होऊ नये, यासाठी पाच महिन्यांपासून टोल फ्री क्रमांकाची सुविधा देण्यात आली. यावर तब्बल ११५८ मतदारांनी संपर्क साधला व शंकांचे निरसन केले. याउलट अ‍ॅपची स्थिती आहे. सी-व्हिजीलवर २३ दिवसांत २७ तक्रारी दाखल झाल्यात. मात्र, सुगम, सुविधा अन् समाधान हे अ‍ॅप मतदारांनी दुर्लक्षित केले आहेत.मतदान केंद्रातील यादीत नाव नसणे, चुकीचे असणे, पत्त्यात बदल यांसारख्या अनेक अडचणी मतदारांना येतात. यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात २५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत या क्रमांकावर ११५८ मतदारांनी कॉल करून शंकांचे निरसन करून घेतले. यामध्ये सर्वाधिक कॉल अमरावती व बडनेरा येथून आले असल्याची माहिती आहे. मतदार याद्या बिनचूक व्हाव्यात, यासाठी ही सुविधा देण्यात आली. मतदार यादीत नाव आहे काय, असल्यास नाव बिनचूक आहे काय, यासाठी ही टोल फ्री सुविधा उपलब्ध आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत ही सेवा सुरू राहते. निवडणूक जाहीर झाल्यापासून या क्रमांकावरील कॉलची संख्या वाढली आहे. अनेकदा या क्रमांकावर मार्गदर्शन मागितले जाते. यामध्ये नाव-पत्त्यात बदल, चुकलेला फोटो बदलणे, मतदान केंद्र याबाबत काय करावे, हा रोख प्रामुख्याने असतो. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात असल्याने या क्रमांकावर अलीकडे येणारे कॉलची संख्या देखील वाढली आहे. सध्या निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांद्वारा यादीचा क्रमांक, मतदार क्रमांकाच्या विषयीचे अधिकाधिक कॉल येत आहेत.१७ तक्रारी पडताळणीअंती रद्दआचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सामान्यांना तक्रार करता यावी, त्यांची ओळख पुढे येऊ नये, यासाठी आयोगाद्वारे यंदा सी-व्हिजिल अ‍ॅप तयार करण्यात आले. या अ‍ॅपवर आतापर्यंत २७ तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी १७ तक्रारी पडताळणीअंती रद्द करण्यात आल्यात. आठ तक्रारी बाद करण्यात आल्यात, तर दोन तक्रारी चौकशीसाठी सबंधिताकडे पाठविण्यात आल्याची माहिती या कक्षाने दिली.‘एनजीएसपी’वर तक्रारी निरंकउमेदवारांना घरबसल्या अर्ज भरता यावा, यासाठी नॅशनल निव्हिनन्स सर्व्हिस पोर्टल (एनजीएसपी) या नावाने उमेदवारांना सुविधा देण्यात आली. मात्र, एकाही उमेदवाराने या पोर्टलचा वापर केलेला नाही. सुविधा अ‍ॅप या उमेदवारांसाठी असलेल्या एक खिडकीला त्यांचा प्रतिसादच नाही. वाहनांच्या परवानगीसाठी सुगम अ‍ॅप सुरू केले असले तरी अद्याप उमेदवारांनी या अ‍ॅपमध्ये स्वारस्य दाखविलेले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019