शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

लॉकडाऊनने बदलली लग्नाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.

ठळक मुद्देशेकडो लग्न साध्या पद्धतीने : बडेजावाला फाटा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : लग्न समारंभ म्हटले म्हणजे अमुुक परिवारापेक्षा आपला थाट जादा हवा, अशी चढाओढ लागते. त्यांच्या मुलीच्या लग्नात जेवलेल्या वऱ्हाडापेक्षा आपल्या येथे जास्त लोक जेवले पाहिजे, हा प्रौढीचा मुद्दा झाला आहे. त्यातच धावपळ, मानसन्मान, रुसवे-फुगवे आले. लग्नकार्य पूर्ण होईपर्यंत वधुपिताच्या जिवाची धाकधूक सुरूच असते. कोरोनाने या सर्वांना फाटा देत अगदी मोजक्या लोकांमध्ये लग्नसमारंभ करण्याचा मंत्र दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.एरवी लग्न समारंभाच्या दिवशी गाजावाजाशिवाय वातावरणनिर्मिती होत नसल्याचा सूर असतो. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो साध्या पद्धतीचे विवाह सोहळे पार पडले आहेत. त्यामुळे लग्न लावणाऱ्या कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. कोणतेही वाद्य, घोडा, मंडप नाही. हजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा, ध्वनिप्रदूषणही नाही. एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे, मानापमानाचे प्रसंग नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने वऱ्हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे.मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सध्या सर्वत्र अशा पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत. यामध्ये वरपक्ष आणि वधुपक्षाकडचे लाखो रुपयांची बचत होत आहे. कोरोनाने जशी शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे.आदर्श घ्यावाचसध्या विवाहांना सुरुवात झाली असून, आता पुढे अशाच लग्नबाबत समाधान असू द्यावे, अशी अपेक्षा अनेक व्यक्ती व्यक्त करीत आहेत. साध्या पद्धतीने विवाह सोहळ्याची ही प्रथा अशीच चालू राहिली, तर शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणारी सर्वसाधारण कुटुंबे यापुढे लग्नासाठी झालेल्या अवाजवी खर्चातून कर्जबाजारी होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न