शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
3
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
4
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
5
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
6
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
7
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
8
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
9
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
10
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
11
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
12
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
13
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
14
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
15
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
16
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
17
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
18
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
19
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
20
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

पुन्हा लॉकडाऊन, ८ मार्चपर्यत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:00 AM

अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी ८ ते ३ या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत.

ठळक मुद्देअमरावती, अचलपूर, गुरुदेवनगर, भातकुलीसह अंजनगाव सुर्जीही कंटेनमेंट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही आता कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात १ मार्चच्या सकाळी ६ पासून ८ मार्चच्या सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांंनी सांगितले.अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी ८ ते ३ या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत. ठोक भाजी मंडई पहाटे २ ते ६ या वेळेत सुरू राहील व त्यात केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. व्यायामशाळा, चित्रगृहे व बहुविध चित्रगृहे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

उर्वरित जिल्ह्यात मुभा सकाळी ९ ते ५ पर्यंत अमरावती लगतच्या बिझी लँड, सिटी लँड, ड्रिम लँड परिसर, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी, भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत तसेच अंजनगाव सुर्जी शहरातलगतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला.  तिथेही संचारबंदीचे हे आदेश लागू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर क्षेत्रांमध्ये यापूर्वी लागू निर्बंध व सवलती कायम आहेत. त्यानुसार तिथे दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या