लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: वलगाव-अमरावती मार्गावरील कॅम्प शार्ट या रस्त्यांचे बजेटमधून ८ कोटी रूपयांच्या निधीतून नवसारी ते चांगापूर फाट्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू आहेत. त्यासाठी शेकडो वृक्षे कापण्यात आलीत. पण, ते वृक्ष कंत्राटदाराने रस्त्यावरच टाकल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्युतनगर मुख्य चौकात कडूनिंबाचे मोठे वृक्ष जमीनदोस्त केलेले आहेत. ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ते चांगापूर फाट्यानजीक तोडण्यात आलेली आहे. परंतु सदर वृक्षे रस्त्याच्या कडेला तशीच पडून आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. काही वृक्षे तर दोन फुटांपर्यंत रस्त्यावर आली आहेत. दोन जडवाहने क्रॉस होताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रात्री या मार्गावरून हजारो वाहने भरधाव येतात. त्यांना अचानक ही झाडे दृष्टीस पडत नसल्यामुळे या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. झाडे तोडणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी अकोला येथील ज्या कंत्राटदाराकडे रस्त्यांचे काम आहे त्या कंत्रादाराला ही पार पाडावी लागणार आहे. परंतु झाडे तोडून महिना झाला असतानाही या झाडांचा खोड या मार्गावर ठिकठिकाणी पडून असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे.तातडीने झाडांचे खोड उचलण्याचा सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. ही प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.- विवेक साळवे,अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.
तोडलेले वृक्ष रस्त्यावर टाकल्याने वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 21:51 IST
वलगाव-अमरावती मार्गावरील कॅम्प शार्ट या रस्त्यांचे बजेटमधून ८ कोटी रूपयांच्या निधीतून नवसारी ते चांगापूर फाट्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू आहेत.
तोडलेले वृक्ष रस्त्यावर टाकल्याने वाहतुकीस अडथळा
ठळक मुद्देअपघाताच्या घटनांत वाढ : अमरावती-वलगाव मार्गावरील समस्या