गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांपैकी ९० टक्के प्रमाण असणाऱ्या ४ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ६८ हजार १८६ सातबारा कायम कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. पीककर्ज फेडल तर औजार कर्ज, विविध योजनांचे कर्ज, मुलांच्या शिक्षणाचे कर्ज आदी कर्जाचा बोजा चढत असल्याने या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी होणार ही चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमाल भूधारक शेतकऱ्यांची संख्या ४,५३,९७४ आहे. यापैकी यांनी धारण केलेले क्षेत्र ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर इतके आहे. तालुकानिहाय पाहता अमरावती तालुक्यात ३४ हजार १७२ शेतकरी आहेत. त्यापैकी २१ हजार ३०० शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा आहे. भातकुली तालुक्यात ३१ हजार ७८३ शेतकरी आहेत. यापैकी २४ हजार ७०६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही. तिवसा तालुक्यात २५ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या १८ हजार ११० सातबारांवर कोठल्या न कोठल्या कर्जाचा बोजा चढलेला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात २३ हजार ६५४ शेतकरी आहेत. यापैकी १७ हजार ७८० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात ३१ हजार ५९२ शेतकरी आहेत. यापैकी २७ हजार १६० शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही.नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३९ हजार ५ ६७ शेतकरी आहेत. यापैकी ३४ हजार ८७० शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाचा बोजा आहे. मोर्शी तालुक्यात ४० हजार ९९८ शेतकरी आहेत. त्यापैकी ३४ हजार ७१४ शेतकऱ्यांवरच्या सातबारावर कर्जाची नोंद आहे. वरुड तालुक्यात ४१ हजार २४० शेतकरी आहे. यापैकी ३६ हजार ४१० शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही. अचलपूर तालुक्यात ३७ हजार १४४ पैकी ३१ हजार ९३२ शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्ज दाखविले आहे. चांदूरबाजार तालुक्यात ४२ हजार ३६६ शेतकरी आहेत. यापैकी ३७ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाची नोेंद आहे. दर्यापूर तालुक्यात ४२ हजार ६१९ पैकी ३६ हजार ११३ शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाचा बोजा आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३२ हजार ०७९ शेतकरी आहेत. यापैकी २७ हजार ३१५ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही. धारणी तालुक्यात १९ हजार ७७४ शेतकरी असून १२ हजार ५७० शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाचा बोजा आहे. चिखलदरा तालुक्यात ११ हजार २५७ शेतकरी आहेत. त्यापैकी ७ हजार ३०९ शेतकरी कर्जदार आहेत.
साडेतीन लाख शेती सातबारांवर कर्जाचा बोजा
By admin | Updated: December 20, 2014 22:31 IST