शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

१.१८ लाख शेतकऱ्यांना ७३७ कोटींची कर्जमाफी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:50 IST

शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख २१ हजार २५५ शेतकºयांना ७५३.१४ कोटींंच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मागील आठवड्यात जवळपास २५ हजार खातेदारांची नववी ग्रीन लिस्ट बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान १.४५ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनववी ग्रीन लिस्ट उपलब्ध : २५ हजार खात्यांची बँकांद्वारा पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख २१ हजार २५५ शेतकºयांना ७५३.१४ कोटींंच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मागील आठवड्यात जवळपास २५ हजार खातेदारांची नववी ग्रीन लिस्ट बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान १.४५ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील बँकांना साधारणपणे ७६ हजार मिसमॅच अर्जांची येलो लिस्ट प्राप्त झाली आहे. या यादींच्या पडताळणीनंतर शासनाच्या आयटी विभागाला याद्या पाठविण्यात आल्या होत्या. त्यामधील पात्र शेतकºयांची नावे आता ग्रीन लिस्टमध्ये पाठविण्यात येत आहेत. आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्हा बँकेच्या कर्जदार एक लाख चार हजार शेतकºयांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धस्तरावर सुरू आहे.एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या शासनाच्या आयटी विभागाकडे अपलोड करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या - त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्यात आल्या आहेत.नवव्या ग्रीन लिस्टची पडताळणी सुरूजिल्ह्यात यापूर्वी सात ग्रीन लिस्ट आल्यात. त्यानंतर आठवी लिस्ट रद्द झाल्याने नववी लिस्ट या आठवड्यात आली. यामध्ये २५ हजार खातेदारांचा समावेश आहे. जिल्हा बँकेचे ४,९२२ खातेदार आहेत यापैकी ४,३२७ खातेदार पडताळणीअंती पात्र झाले आहेत. साधारणपणे कमर्शियल बँकांच्या २० हजार खातेदारांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये थकबाकीदार खातेदार, प्रोत्साहनपर खातेदारांचा समावेश आहे.कर्जमाफीच्या याद्या बँकांमध्ये लागणारअनेक खातेदारांना त्यांच्या कर्जमाफीविषयीची माहितीच नाही. बँका माहिती देत नाहीत, पोर्टलवर नावे नाहीत. त्यामुळे या आठवड्यात ग्रामसेवक तलाठी, तहसीलदार, सहायक निबंधक व संबंधित बँकांमध्ये आजवर कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांंना कर्जमाफीचा लाभ मिळाला की नाही, याची त्वरित माहिती मिळण्यास मदत होणार आहे.