शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

पक्षिमित्रांनी दिले जखमी मोराला जीवदान

By admin | Updated: February 7, 2016 01:03 IST

सर्वांचा आवडता असणारा व राष्ट्रीय पक्षी असलेला पक्षांचा राजा मोर हा सामाजिक कार्यकर्ते पक्षिप्रेमी उज्ज्वल थोरात यांना वडाळी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ...

उपचार : छत्री तलावाजवळ आढळलेल्या मोराला उपवनसंरक्षकांच्या बंगल्यावर नेले संदीप मानकर अमरावतीसर्वांचा आवडता असणारा व राष्ट्रीय पक्षी असलेला पक्षांचा राजा मोर हा सामाजिक कार्यकर्ते पक्षिप्रेमी उज्ज्वल थोरात यांना वडाळी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या छत्री तलावाजवळील जंगलात शनिवारी सकाळी ८ वाजता दरम्यान जखमी अवस्थेत आढळला. या मोरावर खासगी पशू डॉक्टरांकडे उपचार करून काही पक्षिप्रेमींनी हा मोर थेट उपवसंरक्षक निनू सोमराज यांच्या शासकीय निवासस्थानी नेला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दीड तास भर निनू सोमराज बंगल्याच्या बाहेरच न आल्यामुळे येथे उपस्थित पक्षिप्रेमींमध्ये नाराजीचे सूर उमटले. मधुबन वन्यजीव संरक्षण संघटनेचे संस्थापक व पक्षिमित्र उज्ज्वल थोरात हे नेहमीप्रमाणे भानखेड छत्रीतलाव मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांना या मार्गावर जंगलात काही मोर दिसले. २ ते ३ मोर जंगलाच्या दिशेने पळून गेले. परंतु एक मोर जखमी अवस्थेत तेथेच थांबल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले, तर तो मोर जखमी अवस्थेत आढळून आला. पक्षिप्रेमींनी आपले मित्र व नीलेश कांचनपुरे, योगेश खेडकर, लोकेश वानखडे, अभिजित दाणी, गुणवंत पाटील व कुवरचंद श्रीवास यांना माहिती दिली. सर्वांनी जखमी मोराला खासगी पशुवैद्यक अविराज कदम यांच्याकडे नेले. तेथे डॉक्टरांनी मोरावर उपचार केल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र त्यांनी लक्ष न दिल्याने थेट उपवनसंरक्षकांचे निवासस्थान गाठले. पण तेथेही त्यांना निराशा आल्याने त्यांनी वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. पडगव्हाणकर यांच्या ताब्यात दिले. दरम्यान वनरक्षक बी.डब्ल्यू खैरकर यांनी जखमी मोराला जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपचारासाठी दाखल केले.