शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत दगावलेल्या चिमुकलीवर धारणीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

धारणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी गणेश प्रेमलाल पुरते यांची सहा वर्षीय चिमुकली अभिच्छा ही तीन-चार महिन्यांपुर्वी घरावरून पडली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताची गाठ बनली. त्या आॅपरेशनसाठी चिमुकलीला घेऊन तिचे वडील गणेश पुरते, लक्ष्मी पुरते, प्रेमलाल पुरते व शेख सईद शेख हारून (सर्व रा. प्रभाग क्र १२) यांनी रेल्वेने मुंबईस्थित जे.जे. हॉस्पिटल गाठले. होळीपूर्वीच ते तेथे गेले.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : खबरदारी म्हणून चार जण क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उपचारादरम्यान मुंबईत दगावलेल्या येथील सहा वर्षीय चिमुकलीवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मनामनात कोरोनाची दहशत असल्याने धारणीकरांमध्ये चिंतेचे लके र उमटली. त्याअनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने दखल घेत, मुंबईहून परतलेल्या त्या कुटुंबाला होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या. त्या चिमुकलीचे पार्थिव घेऊन एक रुग्णवाहिका मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे पोहोचली. मुंबई शहर कोरोना संसर्गासाठी हॉटस्पॉट ठरल्याने धारणीकरांच्या काळजाचे ठोके चुकले.धारणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी गणेश प्रेमलाल पुरते यांची सहा वर्षीय चिमुकली अभिच्छा ही तीन-चार महिन्यांपुर्वी घरावरून पडली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताची गाठ बनली. त्या आॅपरेशनसाठी चिमुकलीला घेऊन तिचे वडील गणेश पुरते, लक्ष्मी पुरते, प्रेमलाल पुरते व शेख सईद शेख हारून (सर्व रा. प्रभाग क्र १२) यांनी रेल्वेने मुंबईस्थित जे.जे. हॉस्पिटल गाठले. होळीपूर्वीच ते तेथे गेले. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करावयाचे असल्याने ते एका रुग्णवाहिकेने मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास धारणी येथे पोहोचले. याबाबत स्थानिक पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला माहिती मिळताच मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तलाठी तायडे, एपीआय अरुण राऊत, अरविंद सरोदे, बाबूलाल जावरकर यांनी मृताचे घर गाठले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना त्या कुटुंबाला देण्यात आल्या. त्यानुसार अंत्यसंस्कार पार पडले.घर सील; परिसरात सॅनिटायझर फवारणीमृत सहा वर्षीय चिमुकलीचे धारणी येथील घर सील करण्यात आले. नगरपंचयत प्रशासनाने तो परिसर सॅनिटाईज्ड करवून घेतला. चिमुकलीला उपचाराकरिता मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या तिच्या चार नातेवाइकांची उपजिल्हा रुणालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी केली. त्यांना येथील ज्ञानमंदिर कन्या विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू