वर्धा सीमेवर दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:47+5:30

धामणगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन हजार लोकवस्तीचे गाव विटाळा येथपासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते. संपूर्ण राज्यात दारूचे दुकाने बंद असताना या गावात देशी, विदेशी, गावरान दारूची खुलेआम विक्री केली जात असल्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. विटाळा परिसरात देशी दारू, बीअर सहज उपलब्ध होते. बिल देण्यात येत नाही. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात विटाळा गावपरिसरात देशी, विदेशी दारू खुलेआम विक्री जात असल्याच्या तक्रारी राज्य शासनापर्यंत पोहोचल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बीअर बार व दारू दुकानांना लावलेल्या सीलवर प्रशचिन्ह लागले आहेत.

Liquor in the Wardha border | वर्धा सीमेवर दारूचा महापूर

वर्धा सीमेवर दारूचा महापूर

Next
ठळक मुद्देदोन्ही जिल्ह्यांची हद्द खुली। दोन किमी प्रवास, जिल्हाबंदी कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे/मंगरूळ दस्तगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. दोन जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या. मात्र, अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या मध्यंतरी असलेली हद्द बंद करण्यात न आल्याने त्या सीमेवर दारूचा महापूर आला आहे. तब्बल दोन किलोमीटरचा पायी प्रवास करून तळीराम दारू मिळवित आहेत.
धामणगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन हजार लोकवस्तीचे गाव विटाळा येथपासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते. संपूर्ण राज्यात दारूचे दुकाने बंद असताना या गावात देशी, विदेशी, गावरान दारूची खुलेआम विक्री केली जात असल्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. विटाळा परिसरात देशी दारू, बीअर सहज उपलब्ध होते. बिल देण्यात येत नाही. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात विटाळा गावपरिसरात देशी, विदेशी दारू खुलेआम विक्री जात असल्याच्या तक्रारी राज्य शासनापर्यंत पोहोचल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बीअर बार व दारू दुकानांना लावलेल्या सीलवर प्रशचिन्ह लागले आहेत. याच परिसरात वर्धा नदीच्या तिरावर गावरानी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जाते. गावरानी दारूची विक्री होत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा सवाल विटाळा ग्रामस्थांनी लेखी तक्रारीतून विचारला आहे.
पुलगाव ते विटाळा या रस्त्या दरम्यान असलेल्या वर्धा नदीच्या सपाट पुलावर जिल्हाबंदी पाळली जात नाही. त्यामुळे पुलगाव परिसरातील अनेक तळीराम दोन किलोमीटर पायी प्रवास करून अमरावती जिल्ह्यात गावरानी दारू पिण्यासाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मंगरूळ पोलिसांचे कानावर हात
दोन जिल्ह्याच्या मध्यावर असलेली अमरावती जिल्ह्याची हद्द मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. विटाळा ग्रामस्थांनी आपल्या गावपरिसरात अवैध गावठी दारू गाळणाऱ्यांची नावे मंगरूळ दस्तगीर पोलिसांना लेखी तक्रारीत दिली होती. ती ठिकाणही दाखवली, मात्र कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे विटाळावासीयांनी तक्रार केली आहे. दारू पकडणे हे उत्पादन शुल्क विभागाचे काम असल्याचे सांगत पोलिसांनी कानावर हात ठेवले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आमच्या गावात लॉकडाऊन पाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असताना, गावात अवैधरित्या देशी-विदेशी गावठी दारूची विक्री होत आहे. ग्रामस्थ आमच्या गावात दारू पिण्यासाठी येतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.
- मंगेश ठाकरे, सरपंच, विटाळा

Web Title: Liquor in the Wardha border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.