शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

दारू विक्रेत्यांचा हल्ला पोलीस पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:02 IST

अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर परिसरातील शेकडोंच्या जमावाने एकत्र येऊन दगडफेक केल्याने पोलिसांना कारवाई करण्याचे सोडून....

वडाळीच्या परिहारपुऱ्यातील घटना : एसआरपीएफ जवानासह चौघांना अटकलोकमत नेटवर्कअमरावती : अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर परिसरातील शेकडोंच्या जमावाने एकत्र येऊन दगडफेक केल्याने पोलिसांना कारवाई करण्याचे सोडून घटनास्थळावरून अक्षरश: धूम ठोकावी लागली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून विशेष पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळ काढला. ही घटना शुक्रवारी पहाटे ७ ते ८ वाजताच्या सुमारास वडाळीस्थित परिहारपुऱ्यात घडली. घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दारूचे अवैध उत्पादन, विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांतर्फे नेमण्यात आलेल्या विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी परिहारपुऱ्यात गेले होते. काही दारुविक्रेत्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर येथील संतोष मोहोकार या कुख्यात दारुविक्रेत्याच्या घरात दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, संतोषने ती दारु त्याचा भाऊ नंदलाल मोहोकारकडे लपविल्याचे पोलिसांना कळले. माहितीच्या आधारे पोलीस पथक नंदलाल मोहोकारच्या घराची झडती घेण्यासाठी गेले.नियंत्रण कक्षाकडे मागितली मदतअमरावती : घराच्या दुसऱ्या मजल्यावर पोलीस उपनिरीक्षक अमोल मुडे यांच्यासह सात ते आठ पोलीस झडती घेत असताना एसआरपीएफ जवान असलेला संतोष मोहोकारचा भाचा मंगेश सरवरे खोलीत झोपून होता. त्याने पोलिसांना विरोध केला व ‘सर्च वॉरंट’ची मागणी केली. काही महिलांनी पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. मंगेश हा घटनेचे व्हिडिओ चित्रिकरणही करीत होता. दरम्यान त्याने मोबाईलवरून परिसरातील नागरिकांना एकत्रित केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोहोकारच्या घराची झडती सुरुअसतानाच मनीषने पोलिसांशी वाद करून त्यांना धक्काबुक्की सुरु केली. मोहोकार व सरवरे कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना धक्के मारून बाहेर काढल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. परिसरातील शेकडो नागरिकांनी सुद्धा पोलिसांच्या कारवाईला विरोध करीत थेट दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांना अक्षरश: सैरावैरा पळावे लागले. या चकमकीत एक दगड पोलीस शिपाई सय्यद इम्रान यांच्या पाठीवर लागला. पोलिसांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करून मदत मागितली असता काही वेळात अतिरिक्त पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर तणावग्रस्त स्थिती निवळली. याघटनेनंतर पोलिसांनी थेट फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याप्रकरणात एसआरपीएफ जवान मंगेश अशोक सरवरे (३५,रा. परिहारपुरा) याच्यासह ४० ते ५० महिला व पुरूषांविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३६, २९४, ३२३, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी सायंकाळी मंगेश सरवरे, सचिन सरवरे, अशोक सरवरे व शाम बेनिवाल याचौघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.तीनदा नियंत्रण कक्षाला ‘कॉल’परिहारपुऱ्यात दगडफेक सुरु झाल्यानंतर पोलिसांनी धूम ठोकली. पोलिसांनी या दरम्यान तीन वेळा थेट नियंत्रण कक्षाला फोनद्वारे मदतीची हाक दिली. यावेळी काही जण शौचालयात लपले तर काहींनी वडाळीच्या बांबूवनात धाव घेतली. पाच ते दहा मिनिटांपर्यंत पोलिसांनाही मदत मिळाली नाही. मंगेशविरुद्ध विनयभंगाचा गुन्हाएसआरपीएफ जवान असणारा मंगेश सरवरे याच्यावर वर्षभरापूर्वी विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाच्या अनुषंगाने मंगेश निलंबीत सुध्दा झाला होता. मंगेशने पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्यानंतर हा गोंधळ उडाला आणि दारु विक्रेत्यांनी दगडफेक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. म्हणून परिहारपुरावासीयांचा होता रोष या पथकाने सर्वाधिक कारवाया परिहारपुऱ्यातच केल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी परिहारपुऱ्यातील अवैध दारूविक्रेत्यांनी संगनमत करून पोलिसांना हाकलून लावण्याचा डाव रचला. शुक्रवारी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल इंगोले, पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे, एएसआय प्रकाश राठोड, पोलीस कर्मचारी विशाल वाकपांजर, अमर काळे, चेतन कराळे, सय्यद इम्रान खान, विनोद भटकर, सचिन मोहोड, आबीद शेख, बंटी कास्देकर, रवी लिखितकर, जीवन मकेश्वर, महिला पोलीस दीपाली कारमोरे, मीरा उईके व शोभा बेलसरे येथे कारवाईसाठी गेले होते. अकस्मात दगडफेक झाल्याने त्यांची दाणादाण उडाली. पोलिसांचे मोबाईल फोडलेअवैध दारुविक्रेत्यांनी धक्काबुक्की केली आणि परिसरातील नागरिकांना एकत्रित करून अचानकपणे दगडफेक केल्याने पोलीस यंत्रणा भांबावून गेली होती. दरम्यान पीएसआय मुंडेसह तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईलसुद्धा फोडण्यात आले.अवैध दारुसंदर्भात कारवाईचा सपाटा लावल्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे चिडलेल्या दारू विक्रेत्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून सक्त कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त