शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये रंगले माऊलीचे रिंगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 10:08 IST

विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली.

ठळक मुद्देप्रबोधनाचा नवा अध्याय प्रारंभ

सुमित हरकुट।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली. यानिमित्ताने प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला गेला.गतवर्षीपासून यात्रेदरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. ६ ते १३ जानेवरीदरम्यान वारकºयांनी भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. रविवार ७ जानेवारीला ‘माऊलीचा रिंगण’ सोहळा येथे रंगला. यात्रेतील शंकर पटाच्या जागेवर दुपारी २ वाजता या रिंगण सोहळ्याकरिता तयार करण्यात आलेल्या पाच एकर जागेवर विठ्ठलाच्या वारीतील वाखरी येथे रिंगणात धावणारे कर्नाटकच्या शिंतोळे सरकार यांचे माऊलीचे अश्व बहिरम धावले. अश्वांनी तीन रिंगण पूर्ण केल्यावर पावलांना पावन झालेली माती भक्तांनी आपल्या भाळी लावताच बहिरमबुवाचा जयघोष आसमंतात पसरला.या रिंगण सोहळ्याला आळंदी येथील महाराजांच्या पादुका, भक्तीधाम येथील गुलाबराव महाराजांच्या पादुका, बहिरमबाबांच्या पादुका, गुणवंतबाबांच्या पादुकांच्या पालखी आणण्यात आल्या होत्या. या रिंगण सोहळ्या दरम्यान बहिरमबाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी तसेच इतर पदाधिकारी, चांदूर बाजार उपसभापती नितीन टाकरखेडे उपस्थित होते.

बहिरम शंकराच्या कुळातील लोकदेवअमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सातपुडा पर्वताच्या शिखरावर विराजमान बहिरमबुवा अनेकांचे कुलदैवत आहे. जागृत शक्तिपीठ, सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान, पौराणिक महात्म्य लाभलेले लोकदैवत असलेले बहिरमबुवा म्हणजे भैरवनाथ. भगवान शंकराच्या परिवारातील अष्टभैरवा पैकी एक लोकदेव म्हणून त्यांची ओळख आहे.

सर्वाधिक काळ चालणारी यात्राबहिरम येथील प्रसिद्ध यात्रा महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ चालणारी आहे. २० डिसेंबरला विधिवत पूजनाने सुरू होणारी यात्रा २० जानेवारीला समाप्त होते, तर ३१ जानेवारीपर्यंत ती पुरते. पूर्वी दोन वेळा व दहा दिवस भरणारी यात्रा आता वर्षातून एकदाच मात्र महिनाभर असते. तिथीवर भरणारी यात्रा आता तारखेवर आली आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक