शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत मिळेल आॅनलाईन चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:29 IST

धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांकडील पावती बुक बंद होऊन त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने आॅनलाईन चालान ही प्रणाली विकसित केली आहे. स्वयंचलित हँडलद्वारे दंडाची रक्कम, अतिरिक्त तिकीटदेखील प्रवाशांना मिळणार आहे.

ठळक मुद्देतिकीट निरीक्षकांकडे स्वयंचलित हॅण्डल । दंडाची रक्कम, अतिरिक्त तिकीट घेता येणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांकडील पावती बुक बंद होऊन त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने आॅनलाईन चालान ही प्रणाली विकसित केली आहे. स्वयंचलित हँडलद्वारे दंडाची रक्कम, अतिरिक्त तिकीटदेखील प्रवाशांना मिळणार आहे. आॅनलाईनसोबतच रेल्वेने कॅशलेस व्यवहाराची कास याद्वारे धरली आहे.रेल्वेत गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याच्याकडून दंडाची रक्कम अथवा मेमो तयार करण्यासाठी तिकीट निरीक्षकांकडे पावती बुक असते. मात्र, येत्या काळात तिकीट निरीक्षकांकडील कारभार आॅनलाईन केला जाणार आहे. धावत्या गाडीत दंडाची रक्कम अथवा चलान तयार करण्यासाठी आॅनलाइन प्रणाली वापरावी लागणार आहे. त्याकरिता रेल्वेने अद्ययावत स्वयंचलित हॅण्डल मशीन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मशीन सर्व कामकाज आॅनलाईन करण्यासाठी मदत करेल. त्यामुळे तिकीट निरिक्षकांचे लिखित कामांना आणि प्रवाशांच्या घासाघिशीला ‘ब्रेक’ लागणार आहेत. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये धावते पथक किंवा तिकीट निरीक्षकांकडे ही व्यवस्था असणार आहे. दंडाची रक्कम आणि चलान तयार करण्यासाठी तिकीट निरीक्षकांचा वेळ वाचेल. या प्रणालीतून रेल्वेला पारदर्शक कारभाराची मुहूर्तमेढ रोवण्याची चिन्हे आहेत. भुसावळ मध्य रेल्वे विभागात ही प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता तिकीट निरीक्षकांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण दिले जाणार आसल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.आॅनलाईन जनरल तिकीटची सुविधारेल्वे प्रशासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने रेल्वे स्थानकाच्या ५ किमी अंतरापासून दूर असल्यास प्रवाशांना यूटीएस अ‍ॅपद्वारे आॅनलाईन जनरल तिकीट घेता येणार आहे. ही सुविधा सुरू झाली आहे तसेच यूटीआय, पॉस मशीन, क्रेडिट कार्डचा वापरसुद्धा करता येणार आहे. वेळेची बचत आणि पारदर्शक कारभारासाठी आॅनलाइन सुविधांवर भर दिला जात आहे. आॅनलाइन कारभाराविषयी भुसावळ येथे दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे