शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शुध्दीपत्रकांच्या माऱ्यामुळे स्वच्छता कंत्राटासाठी लिमिटेड कॉम्पिटिशन!

By प्रदीप भाकरे | Updated: April 13, 2023 17:29 IST

केवळ १८ निविदा : ‘लोकलला प्राधान्य’च्या अटीने बड्या संस्था दूर

अमरावती : बहुचर्चित झोननिहाय स्वच्छता कंत्राटासाठी महापालिका प्रशासनाकडे एकूण १८ निविदा प्राप्त झाल्या आहेत. सुमारे १४० कोटींचे हे झोननिहाय कंत्राट घे्ण्यासाठी देशभरातील बड्या संस्था समोर येतील, १० कोटींची उलाढाल मागितल्याने अनेक बडे निविदाधारक स्पर्धेत उतरतील, असा प्रशासनाचा होरा होता. मात्र प्रत्यक्षात १२ एप्रिल या निविदा अपलोड करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८ निविदा आल्या आहेत. ३ मार्च रोजी काढलेल्या या निविदा प्रक्रियेदरम्यान शुध्दीपत्रकांचा मारा झाल्याने की काय, या कंत्राटासाठी फारशा संस्था समोर आल्या नसाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सन २०१८ च्या प्रभाग व बाजार मिळून असलेल्या २३ कंत्राटांंना बायबाय करत प्रशासनाने यंदा प्रथमच ते प्रभागनिहाय कंंत्राट झोननिहाय एक असे पाचच द्यायचे, असा निर्णय घेतला. २३ एैवजी पाच कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल, असा त्यामागील होरा होता.

सबब, ३ मार्च रोजी पाच झोनसाठी स्वतंत्र अटी शर्ती असलेल्या पाच निविदा काढण्यात आल्या. त्यादरम्यान २१ मार्च रोजी १७ मुद्द्यांचा समावेश असलेले शुध्दीपत्रक काढण्यात आले. त्या शुध्दीपत्रकानुसार इच्छुकांना निविदा भरता याव्यात, यासाठी प्रक्रियेला ६ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज असताना ५ एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा एकदा शुध्दीपत्रकासह निविदा प्रक्रियेला १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यादरम्यान आलेल्या १८ निविदा आता १७ एप्रिल रोजी उघडल्या जातील. आधी टेक्निकल बिड उघडले जाईल. छाननी होईल. तांत्रिक छाननीदरम्यान १८ निविदांपैकी किती जण गळतात, यावर फायनान्शियल बिडचे भविष्य असेल.

त्यांना दोन झोन, स्थानिकांना प्राधान्यज्या संस्थेची तीन वर्षातील उलाढाल १० कोटींपेक्षा अधिक असेल, त्यांना दोन झोनचे कंत्राट देण्यात येतील, असा बदल २१ मार्चच्या शुध्दीपत्रकानुसार करण्यात आला. तर ५ एप्रिल रोजी काढलेल्या शुध्दीपत्रकानुसार, निविदेत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांच्या/ सेवा सहकारी संस्था पात्र होत असल्यास त्यांनाच स्वच्छता कंत्राट देण्यात येणार आहे.

अशा आल्या निविदा

१२ एप्रिलपर्यंत रामपुरी कॅम्प, राजापेठ व बडनेरा झोनसाठी प्रत्येकी तीन, तर दस्तुरनगर झोनचे स्वच्छता कंत्राट मिळविण्यासाठी पाच निविदा आल्या आहेत. तर, भाजीबाजार झोनचे कंत्राट मिळविण्यासाठी चार निविदांधारकांमध्ये स्पर्धा असेल. दस्तुरनगर झोनचे कंत्राट मिळविण्यासाठी पाच जण सरसावल्याने तेथे कुण्या स्थानिकाचा नंबर लागतो, हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्ट होईल.

टॅग्स :localलोकलAmravatiअमरावती