फोटो कॅप्शन : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथे कडुनिंबाचे झाड कोसळयाने दोन घरांचे नुकसान झाले. (छाया: संजय जेवडे, नांदगाव)
------------------------------------------------------------------------------------------------------------
अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धारणी व चिखलदरा या पाच तालुक्यांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या अकाली पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील सैदापूर अंजनवती शिवारात वीज पडल्याने एक लाख रुपये किमतीची बैलजोडी ठार झाली, तर अंजनसिंगी परिसरातील मोसंबीची झाडे कोलमडून पडली. गव्हाचे पीक पूर्णत: झोपले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथील सुमारे पुरातन कडुनिंबाचे झाड दोन घरांवर कोसळले. या आकस्मिक संकटातून घरात असलेली दोन चिमुकली सुखरूप बचावली. धारणी, चिखलदरा व चांदूररेल्वे येथे भाजीपाला व गव्हाचे नुकसान झाले. चिखलदरा येथील १५ घरांवर टिनपत्रे उडून गेली.
----------------------------