शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महामंडळाचा जीव भांड्यात, स्पीड गव्हर्नरला मुदतवाढ

By admin | Updated: April 22, 2016 01:11 IST

प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता ३१ जुलैपर्यंत ‘स्पीड गव्हर्नर’ बसविता येणार आहे. स्कूल बसेस,

अमरावती : प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता ३१ जुलैपर्यंत ‘स्पीड गव्हर्नर’ बसविता येणार आहे. स्कूल बसेस, घातक वस्तू वाहून नेणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहने, डंपर्स आणि टँकर्सला स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३१ मार्च त्यासाठी डेडलाईन होती. तथापि ट्रक चालक-मालक व एसटी महामंडळाकडून ओरड झाल्याने स्पीड गव्हर्नर बसविण्याच्या अंतिम तिथीत वाढ करण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे एसटी महामंडळासह ट्रक चालक-मालकांचा जीव भांड्यात पडला आहे.केंद्र सरकारचे सहसचिव अभय दामले यांनी गुरुवारी याबाबत एक नोटीफिकेशन काढले. ३१ आॅक्टोबर २०१५ पूर्वी उत्पादित वाहनांना १ एप्रिल २०१६ पासून स्पीड गव्हर्नर’ अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अधिसुचनेला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. १ आॅगस्टपासून ‘स्पीड गव्हर्नर’ न लावलेल्या वाहनांचे पासिंग रोखण्याशिवाय अन्य कारवाई केली जाणार आहे.प्रवासी वाहतूक करणारी व माल वाहतूक करणारी वाहने स्पर्धेसाठी वेगमर्यादा पाळत नाही, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने अधिसूचना काढली. १ आॅक्टोबर २०१५ पूर्वी ज्या वाहनांची नोंदणी झाली आणि अशा वाहनांना ‘वेग नियंत्रक’ बसविलेले नाहीत ,त्यांना १ एप्रिल २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी वेग मर्यादेचा वेग नियंत्रक अनिवार्य करण्यात आले होते. या सक्तीमुळे एसटीबससह ट्रक, डंपर व अन्य जड मालवाहू वाहनांचे नुतनीकरण रखडले होते. अशा वाहनांना आता ३१ जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)१० ते १२ हजारांचे स्पीड गव्हर्नर४स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविल्याशिवाय एसटीसह जड वाहनांचे पासिंगला प्रादेशिक परिवहन विभागाने नकार दर्शविल्याने राज्यभरात स्पीड गव्हर्नरच्या सक्ती विरोधात संतापाचा सूर उमटत होता. अशातच या स्पीड गव्हर्नरची किंमत १० ते १२ हजार रुपये असल्याने अनेक ट्रक मालक आणि महामंडळाने त्याकडे कानाडोळा चालविला होता.एसटीला सर्वाधिक फटका४१ एप्रिलपूर्वी स्पीड गव्हर्नर न बसविल्याने राज्यातील ९५० पेक्षा अधिक एसटीचे पासिंग थांबले होते. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयासह जिल्हास्तरावरील परिवहन कार्यालयात एसटी बसेस थांबलेल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी उच्चस्तरावर एसटी प्रशासन आणि केंद्रीय स्तरावर वाटाघाटी चालल्या. त्याचाच परिपाक म्हणून स्पीड गव्हर्नरची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. महामंडळाकडे तूर्तास १६ हजारांपेक्षा अधिक एसटी आहेत. यातील ७० टक्के बसेसला स्पीड गव्हर्नर नाही. वेग नियंत्रक अर्थात स्पीड गव्हर्नर बसवून घेण्यासाठी आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या वाहनांना स्पीड गव्हर्नर अनिवार्य आहेत. त्यांनी ती ३१ जुलैपर्यंत लावून घ्यावीत.यासंदर्भात गुरुवारी केंद्र सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहेत.- विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी