धारणी : येथील काही कुरेशी बांधवांनी ग्रामपंचायतीचा बनावट ठराव लावून अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून परवाने प्राप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरात एका विशिष्ट समुदायाचे गरजा ओळखून त्याची पूर्तता करण्यासाठी मोठ्या जनावरांचे मांस विक्रीचा व्यवसाय सध्या जोरावर आहे. हा व्यवसाय अधिकृत व्हावा यााठी या व्यवसायाशी संलग्न समाजातील काही व्यक्तींनी धारणी ग्रामपंचायतीकडून कत्तलखाना व मांसविक्रीचा ठराव अन्न व औषधी प्रशासनाकडे सादर करुन परवाना मिळविला. या प्रकरणात संलग्न केलेला ठराव क्रमांक २५ १८ फेब्रुवारी १२ या क्रमांकाचा ठरावच उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता आपण जारी केलला परवाना रद्द करण्याची प्रक्रिया अन्न व औषधी प्रशासन विभागाला राबविण्याची आवश्यकता आहे. ५ ते ६ गावात मोठ्या जनावरांचे मांस खाणारा समुदाय आहे. या समुदायाला लागणाऱ्या पूर्तता करण्याकरिता कुरैशी समाजातील काही बांधव अवैधरित्या जनावरे कापून धुप्या मार्गाने मांसविक्री करीत आहेत. मध्यंतरीच्या काळात या अवैध मांस विक्री व कत्तल खान्यावर पोलिसांनी बंदी आणली होती. त्यामुळे या बंदीमुळे आमच्यावर उपासमारीची ओढवल्याने कत्तलखाना बांधून मिळावा म्हणून कुरैशी संघटनेतर्फे ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात बनावट ठरावाची बाब उघड झाली. आता ग्रामपंचायतीचा बनावट ठरावाच्या आधारे प्राप्त परवाना रद्द करुन प्रशासनाची दिशाभूल करुन फसवणूक केल्याचे प्रकार उघड झाल्याने अन्न व औषधी प्रशासनाने विभाग याकडे काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बनावट ठरावाच्या आधारावर प्राप्त केले परवाने
By admin | Updated: September 27, 2014 00:58 IST