१६ ला आयोजन : हजारो जैनबांधव लावणार हजेरी वरूड : सातपुड्याच्या कुशीत मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर चुडामणी नदीच्या काठावर प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. येथे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम मागील १६ जुलैपासून सुरू झाला आहे. यानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून जैन भाविकांची येथे मोठी गर्दी असते. या पावन भूमिमध्ये आचार्य सन्मती सभागृह भक्तनिवासाचे प्रशस्त बांधकाम करण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन रविवार १६ आक्टोबरला दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, राज्य उद्योग, खनिकर्म तसेच पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, आ. वीरेंद्र जगताप, बैतुलच्या खासदार ज्योती धुर्वे, मुलताईचे आ. चंद्रशेखर देशमुख, माजी आमदार सुखदेव पानसे, आ.हेमंत खंडेलवाल, स्वागताध्यक्ष आ. अनिल बोंडे, विशेष पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते, नागपूरचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पापळकर, बैतुलचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश जैन, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, कार्यकारी अभियंता पाटबंधारे उल्हास क्षीरसागर, शेंदूरजनाघाट नगराध्यक्ष सरिता खेरडे, वरूड नगराध्यक्ष रवींद्र थोरात, वरूडचे ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार नितनवरे, मुलताईचे आदी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अनुप शहा, विनय शहा, विशाल महात्मे, विवेक सोईतकर, मनीष विटाळकर, अरविंद भागवतकर, कमलेश खडके, जयचंद्र ठोले, प्र्रकाश मांडवगडे, प्रदीप आगरकर, ृदेशबंधू महात्मे आदींनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पार्श्वोदय तीर्थ नागठाण्यात आचार्य सन्मती सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:14 IST