शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बोगस ‘जात’ चोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयास पत्र; बनावट कर्मचा-यांची बडतर्फी केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:29 IST

रेल्वेत बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणा-या अधिकारी, कर्मचा-यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे आदेश आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागाने पाच वर्षांत ३६ पैकी एकालाच घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.

अमरावती : रेल्वेत बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणा-या अधिकारी, कर्मचा-यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे आदेश आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागाने पाच वर्षांत ३६ पैकी एकालाच घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत येणा-या अमरावती रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण कक्ष पर्यवेक्षक शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी त्यांना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी रेल्वेने बडतर्फ केले. मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई केली. मात्र, भुसावळ रेल्वे विभागांतर्गत अजूनही ३५ अधिकारी-कर्मचारी ‘जात’ चोरून खुर्च्यांवर कायम आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल याचिकाकर्ते नंदराज मघाळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहून उपस्थित केला. अमरावती व नागपूर विभागीय जात पडताळणी प्रमाणपत्र समितीद्वारे जारी करण्यात आलेल्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे रेल्वेत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आणि त्यानंतर त्यांना नोकरीतून बडतर्फ केले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०१२ मध्ये याचिकेवर सुनावणी करताना रेल्वेत ‘जात’ चोरून नोकरी बळकाविणारे अधिकारी, कर्मचाºयांच्या जात पडताळणीचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाने अनुसूचित जाती, जमातीच्या कर्मचा-यांना नोटीस बजावून त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली व यानंतर या एका कर्मचाºयाला बडतर्फ करण्यात आले. 

नागपूर, अमरावती जात पडताळणी समिती संशयाच्या भोव-यातबनावट जात प्रमाणपत्रावर रेल्वेत नोकरी बळकावल्याप्रकरणी नागपूर व अमरावती येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या संशयाच्या भोव-यात आल्या आहेत. 

‘‘पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकाविणारे अधिकारी-कर्मचारी बडतर्फ करून त्यांनी घेतलेल्या सुविधांचा रोखीने परतावा घ्यावा, असे आदेश दिले होते. मात्र, भुसावळ रेल्वे प्रशासनाने अतिशय संथगतीने कारवाई चालविली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर यांना पत्र पाठवून वस्तुस्थिती कळविली आहे.- नंदराज मघाळेयाचिकाकर्ता तथा सेवानिवृत्त अधिकारी, अमरावती.

टॅग्स :Amravatiअमरावती