शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करू - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

दुसऱ्या लाटेत सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढायला  सुरुवात झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुसज्ज उपचार यंत्रणेसह काटेकोर नियमपालन आवश्यक आहे. उपचार यंत्रणा बळकट होण्याच्या दृष्टीने कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. कोविडपश्चात दक्षतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

ठळक मुद्देनाना पटोलेंच्या उपस्थितीत दर्यापूर येथे ऑक्सिजन प्लांटची पायाभरणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दर्यापूर येथे स्पष्ट केले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ना. ठाकूर यांच्या उपस्थितीत आमदार बळवंत वानखडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची शुक्रवारी पायाभरणी झाली. ५८.६० लाख रुपये निधीतून ऑक्सिजन प्लांट आकारास येणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, तहसीलदार योगेश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष दाबेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  दौऱ्यात मान्यवरांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर, अचलपूरचे कुटीर रुग्णालय येथे भेट देऊन उपचार यंत्रणेचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सादरीकरण केले. तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, मो. नासीर आदी उपस्थित होते.आवश्यकतेनुसार वैद्यकीय मनुष्यबळही मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.

तिसऱ्या लाटेची खबरदारी आवश्यक - नाना पटोलेदुसऱ्या लाटेत सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढायला  सुरुवात झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुसज्ज उपचार यंत्रणेसह काटेकोर नियमपालन आवश्यक आहे. उपचार यंत्रणा बळकट होण्याच्या दृष्टीने कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. कोविडपश्चात दक्षतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरNana Patoleनाना पटोले