शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

रक्त नदी-नाल्यात नव्हे, नाडीत वाहू द्या

By admin | Updated: June 6, 2016 00:18 IST

संत निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे नुकतेच कार अपघातात निधन झाले.

संत निरंकारी मिशन : ७०० दात्यांचे रक्तदानअमरावती : संत निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे नुकतेच कार अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून शहरात ४ व ५ जून रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ७०० दात्यांनी रक्तदान करून मिशनच्या कार्यात योगदान दिले आहे. संत निरंकारी मिशन हे चार पिढीपासून सुरू असून अवतार गुरबचनसिंग बाबांनी केलेल्या महत्प्रयासाने मिशनला भरपूर सहयोग प्राप्त झाले. त्यांनी एकतेचा संदेश अवघ्या जगात पसरविण्याचा केलेला प्रयत्न खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र हरदेवसिंग बाबांनी केले. गुरबचनसिंग यांची २४ एप्रिल १९८० रोजी हत्या करण्यात आली. त्यामुळे 'रक्त नदी-नाल्यांत नव्हे, तर नाडीमध्ये वाहू द्या', असा संदेश हरदेवबाबांनी दिला. गुरबचनसिंग बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निरंकारी मिशनतर्फे जगभरात दरवर्षी २४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. यावर्षी विश्वविक्रम असे २० लाख ८० हजार बाटल्या रक्त जमा झाल्याची नोंद करण्यात आली. त्याअनुषंगाने हरदेवसिंग बाबांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून शहरात ४ व ५ जून रोजी महारक्तदान शिबिर आयोजिले होते. यामध्ये ४ जून रोजी सिटीलँड व बिझिलँड येथे ३३५ दात्यांनी रक्तदान केल्याची नोंद झाली. रविवारी रामपुरी कॅम्पस्थित निरंकारी भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये ३००० दात्यांनी रक्तदान केले. यासाठी कंवरनगर पुज्य पंचायत, शिवधारा समिती, अमरावती रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, अजय दातेराव यांच्यासह निरंकारी मंडळाचे संचालक महेशलाल पिंजानी, अशोकलाल पिंदवानी, सेवादल समितीचे मुकेश मेघानी, सुधीर, धामेचा, गुरुमुख पिंजानी, मनोज नावानी, रवि बजाज, सुरेश पिंजांनी, आनंद पिंजानी, सुनील शादी आदींचे योगदान लाभले.५०० बॉटल्सचे 'टार्गेट'निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या श्रद्धांजलीप्रीत्यर्थ ४ व ५ जून रोजी अमरावती शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५०० बॉटल्स रक्त जमा करण्याचे 'टार्गेट' निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिर आयोजन समितीने ठरविले होते. मात्र हे महान कार्य पाहता या शिबिराला मिशनच्या सेवकांसह आदींनी भरभरून साथ दिल्याने हा आकडा जवळपास ७०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता मिशनचे संचालक अशोकलाल पिंदवानी यांनी व्यक्त केली.