शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्याच्या सखींनी घेतले पाकशास्त्राचे धडे

By admin | Updated: February 17, 2016 00:08 IST

परतवाड्यातील लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी सखीमंच व शिव इलेक्ट्रॉनिक्सच्या संयुक्त विद्यमाने पाक कार्यशाळा रविवारी घेण्यात आली.

कार्यशाळा : शिव इलेक्ट्रॉनिक्स, लोकमत सखी मंचचे आयोजनअमरावती : परतवाड्यातील लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी सखीमंच व शिव इलेक्ट्रॉनिक्सच्या संयुक्त विद्यमाने पाक कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. यावेळी सखींनी पाकशास्त्राचे धडे गिरवले. या कार्यशाळेत सखींना ढोकळा, उपमा, पिझ्झा, खीर, केक, पुलाव, नान या सर्व पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षिका म्हणून जयम पटेल या उपस्थित होत्या. उपस्थित सखींना यावेळी जयम पटेल यांनी प्रश्न विचारले. अचूक उत्तरे देणाऱ्या सखींना बक्षिसेही देण्यात आलीत. कार्यक्रमात शिव इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल लाईन परतवाड्याच्या संचालिका विद्या कराळे यांच्याकडून सखींना 'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून विविध बक्षिसेदेखील देण्यात आलीत. लकी ड्रॉमध्ये राईस कुकर, ब्लेंडर, चॉकर, मायक्रोव्हेव्ह पॉट अशी बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. राशी पटेल, भालेराव, नम्रता पेटे, योगिता पोपली, वाटाणे, मुग्धा काळे या महिलांनी लकी ड्रॉ जिंकला. संचालन योगिता पोपली तर आभार प्रदर्शन अपर्णा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात सखींनी प्रशिक्षकांना विविध प्रश्न विचारून आपले पाककौशल्याचे धडे घेतले. कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी पल्लवी धर्माधिकारी, तारकेश्वरी चिखले, नेहा अविनाशे, कांचन पाटील, माधुरी देशमुख, प्रीती क्षीरसागर, संयुक्ता देशपांडे, शीतल डोंगरे, निलजा मुंदाने, कनक बैस, अलका गावंडे आदींनी प्रयत्न केलेत. यावेळी लोकमत सखी मंच सदस्यता नोंदणीसाठी सन २०१६ चे फॉर्म वितरित करण्यात आले.