शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 20:06 IST

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत कु-हा बिटमधील मौजा राहिमाबाद शिवारात शेतातील विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळून आला.

रितेश नारळेअमरावती : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत कु-हा बिटमधील मौजा राहिमाबाद शिवारात शेतातील विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वनविभागाने बिबट्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मौजा राहिमाबाद गट सर्व्हे क्र. ६९ मधील जगन्नाथ जागळे (रा. कु-हा) यांच्या शेतातील कच्चे बांधकाम केलेल्या कोरड्या विहिरीत बिबट मृतावस्थेत आढळला. तो अंदाजे ४ वर्षांचा आहे.ही विहीर जास्त खोल नसून बिबट सहजतेने उडी घेऊन बाहेर निघू शकला असता, ही विहिरींची स्थिती आहे. त्यामुळे हा बिबट मारला की नैसर्गिक मृत्यू झाला, याबाबत वनविभाग संभ्रमात आहे. मृत बिबटाच्या एकूणच स्थितीवरून आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दरम्यान घटनास्थळी आकोट येथील वन्य जीव विभागाचे श्वान पथक व वन्यजीवतज्ज्ञ वनरक्षक आतिफ हुसेन यांनी घटनास्थळ पिंजून काढले. वनकर्मचाऱ्यांनी विहिरीतून बिबटाला बाहेर काढले व नंतर पशुवैद्यकीय अधिकारी मांजरे, पावडे यांनी घटनास्थळी विच्छेदन केले. त्यानंतर मौजा राहिमाबाद शेतशिवारात त्याला भडाग्नी दिला. बिबटाच्या मृत्यूबाबत संशय आल्यामुळे त्याचे तपास कार्य वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविला असून, घटनास्थळी उपवनसंरक्षक हेमंत मीणा, सहायक वनसरंक्षक अशोक कविटकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर आदींनी भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.१५ दिवसांत दुसरी घटनारहिमाबाद शिवारात १५ दिवसांपूर्वी आधी शेतकरी बंगरे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या शिकारीच्या शोधात आला असता, विहिरीत पडला होता. त्याला शर्तीच्या प्रयत्नानंतर वनकर्मचाºयांनी बाहेर काढले. त्यानंतर आज ही घटना घडली. मात्र, या घटनेत बिबट्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Amravatiअमरावती