शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महादेवखोरी भागात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

महादेव खोरी परिसरात प्रभू येशू प्रार्थना स्थळ आहे. या प्रार्थना स्थळावर ये-जा करण्याऱ्यांची सतत वर्दळ राहते. याच स्थळापासून हाकेच्या अंतरावर वनक्षेत्र सुरू होते. महादेवखोरी परिसराच्या मागील बाजूस निसर्ग टेकड्या आहेत. जंगलाचा भाग असल्याने येथे वन्यजीवांचा संचार नित्याचीच बाब असल्याची माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने दिली. काही दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळे परिसरातील नागरिक पहाटे व सायंकाळी पायदळ भ्रमंतीसाठी जंगलाच्या दिशेने सीमा ओलांडून जातात.

ठळक मुद्देभ्रमंती करणाऱ्यांमध्ये भीती : वनांच्या सीमेत प्रवेश करु नये

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यालगत असलेल्या महादेवखोरी भागात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट दिसून आला. त्यामुळे सायंकाळी पायदळ भ्रमंती करणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने सुद्धा महादेव खोरी परिसर पिंजून काढला. मात्र, तोपर्यंत बिबट जंगलाच्या दिशेने निघून गेला होता, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे.महादेव खोरी परिसरात प्रभू येशू प्रार्थना स्थळ आहे. या प्रार्थना स्थळावर ये-जा करण्याऱ्यांची सतत वर्दळ राहते. याच स्थळापासून हाकेच्या अंतरावर वनक्षेत्र सुरू होते. महादेवखोरी परिसराच्या मागील बाजूस निसर्ग टेकड्या आहेत. जंगलाचा भाग असल्याने येथे वन्यजीवांचा संचार नित्याचीच बाब असल्याची माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने दिली. काही दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळे परिसरातील नागरिक पहाटे व सायंकाळी पायदळ भ्रमंतीसाठी जंगलाच्या दिशेने सीमा ओलांडून जातात. ही बाब वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धोकादायक ठरणारी आहे. शनिवारी बिबट पाण्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाचे वनपाल शेख सलिम यांना महादेवखोरी भागात बिबट शिरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक पोहोचले असता बिबट दिसून आला नाही. शहरालगतच्या वनक्षेत्रात अलिकडे बिबट्याची संख्या वाढीस लागल्याने ते शिकार शोधण्यासाठी नागरी वस्त्याकडे धाव घेत असल्याचे यापूर्वी दिसून आले.महादेव खोरी जंगल भागात गस्त वाढविलीमहादेव खोरी भागापासून वनक्षेत्र सुरू होते. या भागात नवीन नागरी वसाहत असल्याने काही जण भ्रमंतीसाठी लांबपर्यंत जंगलात ये-जा करतात. या भागात वन्यजीव असून, ते आपल्या संरक्षणासाठी नागरिकांवर हल्ला करू शकतात, ही भीती बळावली आहे. त्यामुळे वनविभागाने महादेव खोरी परिसरातील जंगल क्षेत्रात वनकर्मचाºयांनी गस्त वाढविली आहे. जंगल सीमत नागरीक प्रवेश करणार नाही, याची दक्षता वनकर्मचारी घेत असल्याची माहिती आहे.परिसरात अन्य वन्यजीवांचेही वास्तव्यमहादेव खोरी भागात जंगल क्षेत्र असून, येथे बिबट्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात वन्यजीव मुक्त संचार करीत असल्याने ते पाण्याच्या शोधात येऊ शकतात. त्यामुळे भ्रमंतीसाठी जाणाºया नागरिकांनी वनक्षेत्राच्या सीमेत प्रवेश करू नये, असे आवाहन वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या