शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

'त्या' बिबट्याने चिकन कोंबडी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:23 IST

अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडून ठार केले अन् तसेच सोडून दिले.

ठळक मुद्देट्रॅपचाही होणार अभ्यास गरज भासल्यास नागपूरला हलविणार

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडून ठार केले अन् तसेच सोडून दिले.खैरी शिवारातून २५ एप्रिलला दुपारनंतर जेरबंद करून बिबट्याला परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यावर स्क्वीज केजमध्ये उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला भोजनात परत त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, वृत्त लिहिस्तोवर दुसºया दिवशीही त्याने भोजन ग्रहण केले नव्हते.बिबट्याच्या मागच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वेदना दूर करण्याकरिता त्याला वेदनाशामक आणि अँटिबायोटिक दिले जात आहे. त्याच्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे, अमरावती येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज आडे व डॉ. नैनेश कथले औषधोपचार करीत आहेत.यापूर्वी खैरी शिवारात या बिबट्यावर डॉ. गजानन महल्ले आणि डॉ. मिलिंद काळे यांनी औषधोपचार केले. त्याच्या पायाचा एक्स-रे काढण्यात येणार आहे. त्याला नागपूरला हलविले जाणार आहे. ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये ज्या स्क्वीज केजमध्ये त्यावर उपचार सुरू आहेत, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवली जात आहे. कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे.ज्या लोखंडी ट्रॅपमध्ये हा बिबट अडकला, त्याची बनावट वाघाची शिकार करणाऱ्या मध्यप्रदेशातील कटनी येथील बहेलिया गँगकडून वापरल्या गेलेल्या ट्रॅपसारखी आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. पण, खैरी शिवारात आढळलेला हा ट्रॅप कटनी ट्रॅपपेक्षा वजनाने हलका आहे. हरिण किंवा काळवीट पकडण्याकरिता हा ट्रॅप लावला असावा, पण चुकून त्यात बिबट अडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.सुरक्षा वाढवलीज्या ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये बिबट्याला ठेवले आहे, त्या परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. २४ तास वनकर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये बिबट्याची काळजी घेतली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आॅब्झर्र्व्हेशनमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.- डॉ. शिवबाला एस.उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग

टॅग्स :leopardबिबट्या