शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन, विद्यापीठाची सिनेट सभा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 22:44 IST

Amravati university: नुटा संघटनेचा सवाल, कुलगुरूंवर फसवेगिरीचा पत्रपरिषदेत आरोप, सिनेट सदस्यांचे प्रश्न नाकारले

अमरावती : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन झाले. जिल्हा परिषद, महापालिका सर्वसाधारण सभा यादेखील ऑफलाईन होत आहेत, तर मग २९ डिसेंबर राेजी होऊ घातलेली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट सभा ऑफलाईन का नाही, असा सवाल नुटाचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला आहे.

सिनेट सभा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, याबाबत ३३ सिनेट सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना देण्यात आले. मात्र, सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तब्बल ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिनेट सभा होत आहे. असे असताना विद्यार्थी, शैक्षणिक दर्जा, प्रशासकीय कामकाजात सुधारणा याविषयी कुलगुरू चांदेकर यांना काहीही घेणे-देणे नाही, असा एककल्ली कारभार सुरू असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविलेल्या पत्रानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याचा आधार घेत कुुलगुरू पळपुटे धोरण अवलंबित आहे. कुलगुरू चांदेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी सहा महिने राहिले आहे.

त्यामुळे कुलगुरुंना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरप्रकरणावर पडदा टाकायचा असून, ते केवळ फसवेगिरी करीत असल्याचा आरोप सिनेट सदस्य विवेक देशमुख, प्रवीण रघुवंशी, प्रदीप देशपांडे, उत्पल टोंगो, नितीन खर्चे, सुनील मानकर यांनी केला आहे. कुलगुरुंच्या अफलातून कारभाराविरोधत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे. यावेळी संतोष ठाकरे, भीमराव वाघमारे, सतेश्वर मोरे आदी उपस्थित होते.

‘विथहेल्ड’निकालाच्या गर्दीने कोरोना होत नाही का?

सिनेट सदस्य एकत्र आल्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याचे विद्यापीठ प्रशासन सांगत आहे. मात्र, दरदिवशी ८०० ते १००० विद्यार्थी ‘विथहेल्ड’निकालाची समस्या सोडविण्यासाठी येत असताना तेव्हा कोरोना होत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुद्दाम काही सिनेट सदस्यांचे प्रश्न नाकारण्यात आल्याचा आरोप प्रदीप देशपांडे यांनी केला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना सिनेट सभा घेण्याबाबत मार्गदर्शन मागितले होते. कलम १४४ लागू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्राद्धारे कळविले आहे. त्यामुळे सिनेट सभा ऑनलाईन घेण्यात येत आहे. वैयक्तिकपणे कुणाचेही प्रश्न नाकारले नाही. यापूर्वी ऑफलाईन सभा घेण्यात आल्या आहे.

- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ