शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

बंदीजनांच्या हातून निर्मित एलईडी दिव्यांनी कारागृह होणार प्रकाशमय

By admin | Updated: February 6, 2016 00:20 IST

हातून न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजणांनी एलईडीे तयार केले आहे.

२२ जणांचे प्रशिक्षण : दोन ते २० व्हॅटचे १०० दिवे तयारअमरावती : हातून न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजणांनी एलईडीे तयार केले आहे. हा उपक्रम राज्यात पहिल्यांदा अमरावतीत राबविण्यात आला असून शनिवारी कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते १०० एलईडी दिवे लावून कारागृह प्रकाशमय केले जाणार आहे.अमरावती मध्यवर्ती कारागृहात ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत कैद्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणानुसार त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा उपक्रम राबविला जातो. त्याअनुषंगाने गतवर्षी २२ बंदीजणांना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्युत कामासंदर्भाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील या बंदीजणांनी प्राप्त केले होते. दरम्यान कारागृहात महात्मा गांधी इंस्टिट्युट आॅफ इंडियाच्या माध्यमातून एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आयटीआयमध्ये वीजतंत्री म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या २२ बंदीजणांनी एलईडी दिवे निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेतले. या बंदीजणांनी कौशल्य पणाला लावून एखादा नामांकित कंपनीला लाजवेल, असे आकर्षक व डिझाईनचे एलईडी दिवे तयार केले आहे. हे एलईडी दिवे तयार करताना कारागृह प्रशासनाने नामांकित कंपन्याचे सुटे भाग वापरले आहे. बाजारात एलईडी दिव्यांच्या असलेल्या किंमतीच्या तुलनेत हे दिवे निम्म्या दरात निर्माण करण्याची किमया बंदीजणांनी केलीे आहे. कारागृह प्रशासनाने वीज बचतीचा मंत्र स्वीकारला असून एकाच वेळी १०० एलईडी दिवे लावण्याचा बहुमान देखील अमरावतीला जात आहे. एलईडीतून बंदीजनांना रोजगारकारागृहात बंदीस्त असलेल्या बंदीजणांना एलईडी दिवे निर्मितीतून भविष्यात रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद कारागृह प्रशासनाचा आहे. शासन निर्णयानुसार सध्या कारागृहातून ७० वस्तू व साहित्य शासकीय कार्यालये, महाविद्यालय, शाळा पाठविण्यासाठी बंदीजण तयार करतात. मात्र एलईडी दिवे पुरवठा करण्याचा ७१ वा क्रमांक लागल्यास कारागृहासाठी ती मोठी उपलब्धी ठरेल, असे बोलले जात आहे.वीज बचत व बंदीजणांसाठी एलईडी दिवे लाभदायक ठरणारे आहे. पथदिव्यांसाठीदेखील जास्त व्हॅटचे दिवे निर्माण केले जातील. शासनाने कारागृहातून एलईडी खरेदी करण्याचे ठरविले तर ते बंदीजणांसाठी रोजगाराचे मोठे साधन ठरेल.- एस. व्ही. खटावकर,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.