(असाईनमेंट)
इंदल चव्हाण- अमरावती : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई, पुणे येथून आलेले जिल्ह्यातील कामगार आता नोकरीच्या ठिकाणी परतू लागले आहेत.
पहिली लाट ओसरल्यानंतर बरेचसे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी परतले होते. मात्र, दुसरी लाट गतीने वाढीस लागल्यानंतर अनेकांनी परत गावी येणे पसंत केले. आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्याने हजारो कामगार व लहान-मोठे व्यावसायिक आता परतू लागले आहेत.
बॉक्स
सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे
अमरावती जिल्ह्यात बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यातून कामगारांचे स्थलांतर पुन्हा होऊ लागले आहे.
या काळात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या भागातील लोक आलेले होते. ते आता नोकरीसाठी पुन्हा परतू लागले आहेत.
--
शिक्षणासाठी विद्यार्थी गेले परदेशात
अमरावतीतून शेकडो विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्लंड, चीन, सेशेल्स, अमेरिका, कॅनडा, जर्मनी या देशांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊन पुन्हा परदेशात उच्चशिक्षणासाठी परवानगी देण्यात आली आहे.
--
मुले देश परदेशात, चिंता पालकांची
कोट
मी मूळचा घुई (जि. यवतमाळ) येथील रहिवासी. अमरावतीत १० वर्षांपासून आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद राहिल्याने कुटुंबासह मूळ गावी परतून शेती व्यवसाय सुरू केला. शेती व्यवसाय उपाशीही ठेवत नाही. त्यामुळे आता तेच सुरू आहे. अमरावतीत परतणार नाही.
- दिनेश राठोड, नोकरदार
माझी मुलगी दोन वर्षांपासून मुंबई येथे कंपनीत जॉब करते. कोरोनाकाळात तिने अमरावतीत राहूनच ऑनलाईन वर्क फ्रॉम होम केले. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कंपनीत जॉब सुरू केला आहे. त्या भागातील लोक फारसे बाहेर पडत नाही. तरीही आई म्हणून तिची चिंता वाटते.
- अंजली गढीकर, आई