बडनेरा : अमरावती-नागपूर मेमू पॅसेंजर गाडी १५ दिवसांपासून कॉडलाईनने नागपूरकडे रवाना होत आहे. बडनेरावासीयांसह प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या गाडीला पूर्वीप्रमाणे व्हाया बडनेरा सोडण्याची अशी मागणी जोर धरून आहे. याकडे खासदार नवनीत राणा यांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडीला नवा लुक देण्यात आला. ‘मॉडीफाईड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन समान ही गाडी आहे. १६ डब्यांच्या या गाडीची आसन व्यवस्था सुटसुटीत आहे. नवा लुक देण्यापूर्वी ही पॅसेंजर गाडी व्हाया बडनेरा रेल्वेस्थानकाहून जात होती. या पॅसेंजरला बडनेऱ्यातून मोठा प्रवासी वर्ग येत होता. परिसरातील खेड्यांवरील प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत सोईची होती. विद्यार्थी रेल्वेस्थानकाहून बडनेऱ्यात येत होते. मात्र नवा लुक दिल्यानंतर ही पॅसेंजर अमरावतीहून थेट कॉड लाईनने नागपूरकडे जात आहे. बडनेरा वगळल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वीप्रमाणे या गाडीला व्हाया बडनेरा सोडावे तसेच येताना बडनेराहून अमरावतीकडे रवाना करण्यात यावे, अशी मागणी आहे.मेमू पॅसेंजर गाडी व्हाया बडनेरा गेली पाहिजे. बडनेऱ्यातून या गाडीला मोठा प्रवाशीवर्ग आहे. जंक्शन स्टेशन असणाऱ्या बडनेरा स्टेशनचे यामुळे महत्त्व कमी होत आहे.- नितीन मांजरे, बडनेराअमरावती-नागपूर पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे व्हाया बडनेरा यावी. ही गाडी बडनेºयातून जात नसल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी.- गौरव बांते, बडनेरा
नागपूर पॅसेंजर व्हाया बडनेरा सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST
अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडीला नवा लुक देण्यात आला. ‘मॉडीफाईड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन समान ही गाडी आहे. १६ डब्यांच्या या गाडीची आसन व्यवस्था सुटसुटीत आहे. नवा लुक देण्यापूर्वी ही पॅसेंजर गाडी व्हाया बडनेरा रेल्वेस्थानकाहून जात होती. या पॅसेंजरला बडनेऱ्यातून मोठा प्रवासी वर्ग येत होता.
नागपूर पॅसेंजर व्हाया बडनेरा सोडा
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : खासदारांना साकडे