शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

‘त्या’ जागेची लीज प्रक्रिया थांबली

By admin | Updated: June 23, 2015 00:48 IST

धारणी शहरालगत दिया येथील शेत सर्वे नं. १२ मधील पाच हेक्टर शासकीय जागा १५ वर्षांच्या लीजवर यशराज माईन्स कंपनीला देण्याची...

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : एसडीओंकडून प्रस्ताव मागविलाराजेश मालवीय धारणीधारणी शहरालगत दिया येथील शेत सर्वे नं. १२ मधील पाच हेक्टर शासकीय जागा १५ वर्षांच्या लीजवर यशराज माईन्स कंपनीला देण्याची तयारी महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी करीत आहे. सदर शासकीय जागा खदानीसाठी कोणत्याही खासगी कंपनीला देण्यात येऊ नये. ती जागा आदिवासी व गैरआदिवासींना गौण खनिजाकरिता राखीव ठेऊन त्यातून महसूल घ्यावा, अशी लेखी तक्रार माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्यांदा केल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल एसडीओंकडून मागून लीजवरची प्रक्रिया थांबविली आहे. तालुक्यातील ४,४२३ घरकूल लाभार्थी आणि ८०० विहिरींच्या बांधकामासाठी आदिवासी व गैर आदिवासींना मोठ्या प्रमाणात गिट्टी, डब्बर इत्यादी गौण खनिजाची आवश्यकता आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दिया येथील सर्वे नं १२६ ची जागा लाभार्थ्यांसाठी गौण खनिजाकरिता आदेशित केल्यास लाखो रूपयांचा महसूल मिळू शकतो. मात्र धारणी येथील गर्भश्रीमंत असलेल्या यशराज माईन्स कंपनीने शहरात अगदी लागून दिया शेत सर्वे नं. १२६ मधील शिल्लक ५ हेक्टर शासकीय कोट्यवधींची जागा हेरून तलाठीकडून सातबारा, नकाशा घेऊन खदानीचा प्रस्ताव तयार करून लीजवर घेण्यासाठी लाखो रूपयांची चालानसुद्धा भरली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच येथील भूमीअभिलेख कार्यालयाने सर्वे नं. १२६ मधील ५ हेक्टर जागेची तातडीने मोजणीसुद्धा करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोट्यवधींची ५ हेक्टर शासकीय जमीन कवडीमोल भावात यशराज माईन्स कंपनीला १५ वर्षांच्या लिजपट्ट्यावर देण्याची तयारी येथील महसूल व जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी करीत असल्याचे दिसून आले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून येथील एसडीओंकडून सविस्तर अहवाल मागवून लीजवर देण्याची प्रक्रिया थांबविली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने सन १९८३ मध्ये कायदा करून महसूल विभागाच्या ई-क्लासच्या रिकाम्या पडीक जागेपैकी असणाऱ्या वनसदृश्य जमिनी या वनविभागाला हस्तांतरित केल्या आहेत. या जागेवर वन विभागाची मालकी असून त्या खासगी व्यक्ती किंवा कंपनीला देता येत नाही. दिया सर्वे नं. १२६ पैकी शिल्लक जागा ही वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही ती जागा लीजवर दिल्या जात असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होत आहे. शहरालगत दिया शेत सर्वे नं. १२६ मधील कोट्यवधींची शासकीय जागा महसूलच्या नावावर यशराज माईन्स कंपनीला देण्यात येऊ नये. ती जागा फक्त तालुक्यातील घरकूल व विहिरींच्या शेकडो गरीब गरजू लाभार्थ्यांना गौणखनिजकरिता उपलब्ध करून दिल्यास लाखो रूपयांचा महसूल जमा होईल. अन्यथा असा गैरप्रकार झाल्यास सर्व लाभार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल. - राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट.दिया शेत सर्व्हे नंबर १२६ मधील शासकीय शिल्लक जागेविषयी धारणी एसडीओंचा अहवाल आल्यानंतर त्याला विथड करणार आहे.- किरण गित्ते,जिल्हाधिकारी, अमरावती.