शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची पळवाट, व्यापाऱ्यांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:21 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर एफएक्यू प्रतवारीच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत असताना नॉन एफएक्यूसाठी मात्र कोणतेच धोरण नाही.

ठळक मुद्देयंत्रणांसमोर पेच : बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची बेभाव खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर एफएक्यू प्रतवारीच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत असताना नॉन एफएक्यूसाठी मात्र कोणतेच धोरण नाही. हीच कायद्याची पळवाट व्यापाºयांच्या पथ्थ्यावर पडल्याने शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे. याविषयी आता जिल्हा उपनिबंधकांनी निकषातील फरकाचे आधारभूत दराविषयी पणन संचालकाकडे मार्गदर्शन मागविले आहे.जिल्ह्यात नाफेडद्वारा शासन खरेदीचे १२ केंद्र तालुकास्तरावर सुरू करण्यात आले. मात्र याठिकाणी शासन निकषानुसार अटी व शर्तींनुसारच सोयाबीनची खरेदी सुरू आहे. यामध्ये प्रमुख अट आर्द्रतेची आहे. १२ टक्के आर्द्रता ग्राह्य धरण्यात येते तेव्हाच हमीभाव म्हणजेच ३०५० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. मात्र यापेक्षा थोडा जरी फरक असल्यास सोयाबीन नाकारले जाते. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक बाजारात व्यापाºयांना सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय राहत नाही. या ठिकाणी मात्र शेतकºयांची नड पाहून अगदी १५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी यंदाच्या हंगामात झालेली आहे. नॉन एफएक्यू सोयाबीनच्या बाबतीत ग्रेडेशन कसे करावे तसेच या प्रतवारीच्या सोयाबीनमध्ये दरात तफावत किती असावी, याविषयी कोणतेच शासन धोरण नसल्यामुळेच व्यापाºयांद्वारा शेतकऱ्यांची हजार ते दीड हजारांच्या फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे. याविषयी सातत्याने शेतकºयांच्या तक्रारी असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी नॉन एफएक्यू प्रतवारीचे सोयाबीन ग्रेडेशन करताना आधारभूत दरात फरकाची निश्चिती करावी, याविषयीचे मार्गदर्शन पणन संचालकाकडे मागितले आहे.असे आहे एफएक्यूचे शासन निकषसोयाबीन हे फॉरेन मॅटर अ‍ॅन्ड इम्पुरीटीज २ टक्के, श्रीवेल्ड इमॅच्युअर बीन्स अ‍ॅन्ड डीसकलरल्ड ५ टक्के, डॅमेज अ‍ॅन्ड विविल्ड बीन्स ३ टक्के, मेकॅनिकली डॅमेज बीन्स १५ टक्के व मॉईश्चर १२ टक्के असावे असा निकष आहे. त्यानंतरच केंद्रावर शासन खरेदी होते व अधारभूत किंमत मिळते. अन्यथा सोयाबीन नाकारण्यात येत असल्यामुळेच शेतकºयांची व्यापाºयांद्वारा बेभाव खरेदी करण्यात येते.तरच विक्रीला परवानगीज्या बाजार समितीमध्ये आवक जास्त आहे त्याच ठिकाणी नॉन एफएक्यु प्रतवारीचा माल विक्रीसाठाी येण्याची शक्यता जास्त आहे.हे सोयाबीन प्रमाणित करण्यासाठी सहायक निबंधक, बाजार समित्यांचे सचिव पाहणी करून प्रमाणित करील व त्यानंतरच लिलावास परवानगी दिल्या जाते. मात्र या शासन नियमाला सर्वच ठिकाणी खो दिल्या जातो.एफएक्यू व नॉन एफएक्यूचे निकषात असलेल्या फरकानुसार त्याची आधारभूत किंमत ठरविली जावी व प्रत्येक बाजार समितीमध्ये ग्रेडरचे पद निर्मिती व्हावी, याविषयी शासनाला कळविले आहे.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Farmerशेतकरी