शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन एटीएममध्ये लावले स्किमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:24 IST

एटीएममधून पैसे काढायचे असेल, तर सावधगिरी बाळगा. कारण स्किमरचा वापर करून बँक खात्याची माहिती लीक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे.

ठळक मुद्देसायबर सेलचा निष्कर्ष : एटीएम कार्ड क्लोन करून पैशांची परस्पर उचल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एटीएममधून पैसे काढायचे असेल, तर सावधगिरी बाळगा. कारण स्किमरचा वापर करून बँक खात्याची माहिती लीक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. अमरावती शहरातून एटीएम कार्डची माहिती मिळविल्यानंतर त्याचा क्लोन बनविण्यात येतो आणि त्या क्लोनच्या आधारे बनावट एटीमएम कार्ड बनवून खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढली जाते.स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शहरातील तीन एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती चोरल्याचा निष्कर्ष सायबर सेलने काढला आहे. सायबर गुन्हेगारांची एक टोळी ही माहिती अन्य शहरात कार्यरत असलेल्या दुसºया टोळीपर्यंत पोहोचवून खात्यातून पैसे काढते. आतापर्यंत घडलेल्या प्रकरणांमध्ये बँक खात्यातील पैसे हरियाणा, आसाम व गुडगाव भागातून काढण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांची एक टोळी अमरावतीत, तर दुसरी टोळी ही वरील नमूद शहरांमध्ये असल्याचा निष्कर्षाप्रत येत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. आतापर्यंत शहरात सहा गुन्ह्यांमध्ये तब्बल सात लाखांपर्यंतची रक्कम बँक खात्यातून काढण्यात आली आहे.असे लावले जाते स्किमरएटीएम मशीनमध्ये कार्ड टाकले जाते, त्यानजीक स्किमर लावले जाते. एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकताच त्यावरील माहिती स्किमर कॅच करते. पासवर्ड जाणून घेण्यासाठी सायबर गुन्हेगार किपॅडच्या वरील बाजूस छोटा कॅमेरा लावतात. कार्ड व पासवर्डची माहिती मिळताच अन्य शहरात क्लोन कार्ड तयार केले जाते. त्या बनावट एटीएम कार्डद्वारे तेथून पैसे विड्रॉल केले जातात.सीसीटीव्हीची तपासणीसायबर गुन्हेगारांनी तास-दोन तासांसाठी स्किमर व कॅमेरे लावून एटीएमवरील व्यवहारांची माहिती चोरल्याचे स्पष्ट होत आहे. या अनुषंगाने सायबर सेलकडून कसून चौकशी सुरू असून, एटीएममधील सीसीटीव्हीचा डेटा तपासणीचे काम हाती घेतले आहे. यासंदर्भात लवकरच सायबर सेलचे पथक पुणे शहरात जाणार आहे.शहरातील काही एटिएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती लीक केल्याची शक्यता आहे. आतापर्यंत सहा गुन्हे समोर आले असून, एटीएमधारकांनी पैसे काढताना तसे काही आढळळ्यास पोलिसांना कळवावे. याप्रकरणात पोलीस सखोल तपास करीत आहे.- कान्होपात्रा बन्सा,पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.