अमरावती : जिल्हा परिषदेच्या परिसरातील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर निर्लेखित साहित्य पडून आहे. या भंगार साहित्याने नाहकच जागा व्यापून घेतल्यामुळे अन्य कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.
...........................
शाळेतील मैदानावर पसरला सन्नाटा
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पासून शाळा - महाविद्यालये बंद आहेत. केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुले शाळेऐवजी घरीच आहेत. परिणामी शाळेच्या मैदानावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
..........................................
शिक्षण समितीची सभा
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीची सभा बुधवारी सभापती सुरेश निमकर यांच्या दालनात आयोजित केली आहे. यावेळी विविध विषयावर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
.......................
दिव्यांगांच्या स्वावलंबन प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम
अमरावती : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सहजरीत्या स्वावलंबन प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाव्दारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दर बुधवारी सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत दिव्यांगांनी युडीआयडी पोर्टलवर सादर केलेल्या अर्जाची प्रत व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.
............................
निमखेड बाजार ते सावरपाणी रस्ता उखडला
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार ते सावरपाणी गावाकडे जाणारा रस्ता अनेक महिन्यापासून उखडला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक कसरत करावी लागत आहे. हा रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.