लस उपलब्ध नाही : शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात धामणगाव रेल्वे : पशुधनासाठी शासनाने पशुविभागाकडे सर्पदंशाची लस उलपब्ध करून न दिल्यामुळे दरवर्षी राज्यात शेकडो जनावरे सर्पदशांने दगावत असून गावठी उपचारांना यश मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे़ तालुक्यात गेल्या सहा वर्षात पावसाळ्यात तीनशे जनावरे सर्पदशांमुळे दगावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़तालुक्यात चाळीस हजार जनावरे असून शेतकऱ्यांचा हा आधारवड आहे़ एखादा बैल आजारी पडल्यास शेतकरी अहोरात्र त्याची सुश्रुशा करतात. मात्र, शेतकऱ्यांच्या पशुधनाकडे शासनाचे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे़ चरवाढलेल्या गवतामधून अनेकदा या जनावरांना सर्पदंश होतो़ त्यांना पशुदवाखान्यात आणले जाते. मात्र, त्यांच्यावर कोणताही उपचार होत नाही. गेल्या सहा वर्षांत सर्पदंशाने ३०० जनावरांना जीव गमवावा लागला़ सर्पदंशावर गावठी पध्दतीने उपचार करण्यात येते़ परंतु बदलत्या काळाप्रमाणे गावठी उपचार करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे जनावरे डोळ्यांदेखत सर्पदंशाने दगावल्याचे शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागते.
सहा वर्षांत सर्पदंशाने ३०० जनावरे दगावली
By admin | Updated: July 17, 2015 00:22 IST