शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विदर्भात धडक सिंचन योजनेतील चार हजार विहिरींना अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:27 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या धडक सिंचन योजनेतील तब्बल ४ हजार २७५ विहिरींची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देनियोजन विभागाची तंबीशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांतील कामे रखडली

आॅनलाईन लोकमतअमरावती : विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या धडक सिंचन योजनेतील तब्बल ४ हजार २७५ विहिरींची कामे रखडली आहेत. यासाठी शासनाने अखेरची संधी दिली असून, या विहिरींची कामे ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांद्वारा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत व विदर्भात शेतकरी आत्महत्याप्रवण असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम २००६ ते २००९ या कालावधीत हाती घेतला. विदर्भात ८३ हजार २०१ विहिरींचे लक्ष्यांक देण्यात आले. यापैकी ६३ हजार ९६२ विहिरींना मंजुरी मिळाली. आतापर्यंत ४४ हजार १३६ विहिरींचीच कामे पूर्ण होऊ शकली. यामध्ये अमरावती विभागातील ३८ हजार ९४२ व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ५ हजार १९७ विहिरींचा समावेश आहे. अद्याप या सहा जिल्ह्यांतील २ हजार ८८३ विहिरींची कामे अर्धवट स्थितीत आहे, तर ४ हजार २७५ विहिरींची कामे सुरूच झाली नसल्याने नियोजन विभागाने ३० जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट केले होते. आता नोव्हेंबर २०१७ च्या परिपत्रकान्वये या सर्व विहिरींची कामे ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची अखेरची संधी दिली आहे.नरेगातून धडक सिंचन योजनेत परत घेण्यात आलेल्या विहिरी तसेच यापूर्वी रद्द झालेल्या, परंतु पुन्हा सुरू करण्यात येणाऱ्या विहिरींसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांद्वारा आता स्पेशल ड्राईव्ह करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या लाभार्थ्यांना विहिरींची कामे करावयाची नाहीत, त्यांच्याकडून लेखी घेऊन किंवा पंचनामा करून रद्द करण्यात याव्यात व यानंतर भविष्यात अशा स्वरूपाच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे नियोजन विभागाने निक्षून बजावले आहे.धडकमध्ये ६,५१८ विहिरींची कामे पुनरुज्जीवितविदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन योजनेतील १५,४३० विहिरी रद्द करण्यात आल्यात. मात्र, यापैकी १०,५२१ विहिरींना शासनाने पुन्हा मंजुरी दिली. पडताळणीअंती ६,५१८ विहिरी पुनरुज्जीवित करण्यात आल्यात. यापैकी सद्यस्थितित २,६५३ विहिरींची कामे पूर्ण झाली, तर अद्यापही ३,८१५ विहिरींची कामे रखडली आहेत. यापैकी १,०३४ विहिरींची कामे आता प्रगतिपथावर आहेत. या योजनेंतर्गत ५२० कोटी ८१ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. यापैकी ३९४ कोटी खर्च झालेत. अजून १२६ कोटी ८० लाखांचा निधी शिल्लक असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

टॅग्स :Waterपाणी