शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मोठ्या ठिपकेदार गरुडाची अमरावतीच्या आकाशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST

पोहरा-मालखेड जंगलात कॅमेर्यात कैद, जिल्ह्यातील पहिली नोंद अमरावती : ‘ग्रेटर स्पॉटेड ईगल’ या गरुडवर्गीय पक्ष्याला पक्षिअभ्यासक, छायाचित्रकार प्रशांत निकम ...

पोहरा-मालखेड जंगलात कॅमेर्यात कैद, जिल्ह्यातील पहिली नोंद

अमरावती : ‘ग्रेटर स्पॉटेड ईगल’ या गरुडवर्गीय पक्ष्याला पक्षिअभ्यासक, छायाचित्रकार प्रशांत निकम आणि संकेत राजूरकर यांनी पोहरा-मालखेड वनपरिक्षेत्रात कॅमेर्यात कैद केले. जिल्हा आणि परिसरात यापूर्वी कधीही या पक्ष्याची नोंद झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रशांत निकम व संकेत राजूरकर यांना १३ फेब्रुवारीला पक्षिनिरीक्षण करताना पोहरा-मालखेड वनपरिक्षेत्रात नियमित भटकंतीदरम्यान 'ग्रेटर स्पॉटेड ईगल' अर्थात 'मोठा ठिपकेदार गरुड' या पक्ष्याचे दर्शन झाले. सुमारे ६२ ते ७२ सेमी अर्थात दोन-अडीच फूट लांबी असलेल्या या शिकारी पक्ष्याच्या पसरलेल्या पंखांमुळे एकंदर लांबी ही ५.२५ ते ६ फूट एवढी प्रचंड होते. गर्द काळपट तपकिरी डोके आणि पंखांची किनार असणाऱ्या या पक्ष्याच्या शेपटीखाली असलेली इंग्रजी ‘व्ही’ आकारातील पांढरी पिसे ही या पक्ष्याची विशेष ओळख आहे. परंतु, अवयस्क गरुडामध्ये हे वैशिष्ट्य बरेचदा दृष्टीस पडत नाही. शरीर आणि पंखांवरील छोट्या पांढऱ्या ठिपक्यांवरून याला हे नाव प्राप्त झाले आहे.

------

क्लांगा क्लांगा

‘मोठा चितळा गरुड’ या मराठी नावाने ओळखला जाणार्या या पक्ष्याचे ‘क्लांगा क्लांगा’ हे शास्त्रीय नाव आहे. भारताच्या उत्तर भागात निवास करताना हा गरुड स्थानिक हिवाळी स्थलांतराच्या शेवटच्या टप्यात मध्य व दक्षिण भारतात येतो. भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमार येथेही तो आढळतो.

--------------

दलदलीच्या प्रदेशात आढळ

बेडकासारखे उभयचर आणि जलाशय व दलदलीच्या भागातील सरपटणारे प्राणी हे याचे खाद्य आहेत. त्याकरिताच मोठ्या जलाशयाच्या ठिकाणी, दलदलीच्या प्रदेशात याचा मुख्य आढळ असतो. यासोबतच इतर शिकारी पक्ष्यांचे खाद्य पळवणे, पाणकोंबडीसारखे काही पाणपक्षी हे याच्या खाद्याचा मुख्य स्रोत आहे. एप्रिल ते जून हा या पक्ष्याचा विणीचा हंगाम असून, झाडाच्या टोकावर मध्यभागी खोलगट भागात घरटे वाळलेल्या काटक्या आणि फांद्या यापासून तयार होते.

---------

आकाशात अतिशय उंचीवर उडत असल्यामुळे आणि शिकारी पक्ष्यांच्या सर्वसाधारण समान शरीर वैशिष्ट्यांमुळे गरुडवर्गीय शिकारी पक्ष्यांची ओळख पटवून त्याची नोंद घेणे अवघड काम असते. परंतु, सततचे पक्षिनिरीक्षण अशा महत्त्वाच्या नोंदी होण्यास मदत होते.

- प्रशांत निकम, पक्षिअभ्यासक

-----------

केवळ व्याघ्र केंद्रित होऊ पाहणाऱ्या जंगल भ्रमंती ऐवजी आपल्या जवळच्या, आसपासच्या परिसरातील इतर निसर्ग घटक, वन्यजीवन, पक्षिजीवनाबद्दल आकर्षण आणि अभ्यास वाढल्यास पर्यावरणपूरक अशी सकारात्मक आत्मीयता निर्माण होऊ शकते.

- संकेत राजूरकर, पक्षिअभ्यासक

.