शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

समृद्धी महामार्गाला शेतजमिनी देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 00:14 IST

केंद्र सरकारने सन- २०१३ मध्ये लागू केलेल्या भूसंपादन कायद्याला छेद देत नागपूर- मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी ताब्यात घेण्याचा घाट भाजप सरकारने रचला आहे.

धरणे आंदोलन : शेतकरी, लोकप्रतिनिधी एकवटलेअमरावती : केंद्र सरकारने सन- २०१३ मध्ये लागू केलेल्या भूसंपादन कायद्याला छेद देत नागपूर- मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी ताब्यात घेण्याचा घाट भाजप सरकारने रचला आहे. मात्र या महामार्गासाठी हितभरही जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार बुधवारी धरणे आंदोलनात लोकप्रतिनिधी व कृती समितीने केला आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनातून शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. नागपूर - मुंबई दु्रतगती शिघ्रसंचार महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. पंरतु राज्य सरकार हे शेतकऱ्यांना भुलथापा देत जमिनी बळकाविण्याच्या घाट रचत आहे. या मार्गामुळे शेतकरी भूमिहिन होणार असून हे अन्यायकारक आहे. त्यामुळे महामार्गाला जमिनी देण्यास उपस्थित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. अमरावती, वाशिम, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यातील शेतकरी तसेच कृतीसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आ. वीरेंद्र जगताप, आ. अमित झनक, आ. अमर काळे, माजी मंत्री सुबोध सावजी, तुकाराम भस्मे, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, चंद्रकात पाटील, दिलीप जाधव, आनंद नाईक, अभिजित ढेपे, प्रकाश डहाके, नितीन पिसे, केशवराव तांदुळकर, सुनील मेटकर, नीळकंठ ढोके, प्रदीप देशमुख, आदींची उपस्थिती होती. भाजपा सरकारने निवडणुकीदरम्यान ‘अच्छे दिन’ येण्याचे स्वप्न दाखविले. परंतु अजुनही शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळाले नाही. शेतमालाला उत्पादनावर आधारीत भाव नाही. कर्ज माफीसाठी सरकारजवळ पैसे नाहीत. असे असताना महामार्ग निर्मितीसाठी पैसा कसा उपलब्ध होतो? असा सवाल आ. वीरेंद्र जगताप यांनी उपस्थित केला.शेतकरी सतत दुष्काळ, नापिकीचे त्रस्त असताना भाजपचे शासन त्यांना सावरण्याऐवजी भूमिहिन करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. काहीही झाले तरी जमिनी देणार नाही. प्राण गमावू पण जमीन नाही? असा निर्धार शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिंधीनी घेतला. या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना सत्य माहिती का दिली जात नाही. शेतजमिनी ताब्यात घेवून काय करणार आहेत? याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सरकार व अधिकारी देत नाही. तर दुसरीकडे नागपूर - मुंबई हा दोन महानगरांना तासी १५० किमी वेगाने जोडणाऱ्या महामार्गाकरिता जमीन भूसंचयन अधिग्रहणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांतून २ हजार ३५१ शेतकऱ्यांची पाच हजार हेक्टर जमीन २५७ किमीच्या रस्त्याकरिता घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना सहभागी करून दहा जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतून जाणारा रस्ता २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने अधिसुचनेद्वारे जाहीर केले आहे.मात्र शेतकऱ्यांना दाखविलेले स्वप्न शेतकरी, शेतमजुरांचे विघ्न ठरणार असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. शासनाने या महामार्गासाठी शेतजमिन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार भागीदार पद्धतीच्या प्रकल्पाकरिता बाधित शेतकऱ्यांच्या ७० टक्के सहमतीची गरज असताना शासनाकडून लाभ, लोभाच्या योजनांचे गाजर दाखविल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला आहे. या नव्या महार्गाला समांतर पूर्वीच दोन महामार्ग उपलब्ध असताना याच दोन शहरांना जोडणाऱ्या नव्या महामार्गाची गरज काय? असे एक ना अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. या रस्त्याच्या शेतजमिनी अधिग्रहण करण्याला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शासन अधिग्रहण, भूसंचयन करीत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढ्या बर्बाद होतील. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी आ. जगताप, काळे, झनक, सावजी आदींनी व्यक्त केला. महामार्गाला कदापीही शेतजमिनी न देण्याचा निर्णयाला उपस्थित शेतकऱ्यांनी एकमताने सहमती दिली. येत्या १६ सप्टेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम येथील जिल्हाधिकाऱ्यांना कृती समितीच्या वतीने शासन निर्णयाच्या विरोधाचे निवेदन देण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)