शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपामुळे लालपरी थांबली, १७ कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:01 IST

एसटीचा संप मिटला : ८४३ पैकी ३६५ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. ८ आगारांतील चालक-वाहकांनी या संपात भाग घेतल्याने एसटीच्या ८४३ पैकी ३६५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, एसटी महामंडळाने सुमारे १७ कोटी ७१ लाख २३३ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

संपामुळे एसटी चाके आगारातच थांबल्याचे दिसून आले. एसटी बंदचा प्रवाशांना मोठा फटका बसून मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशी, विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागला. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागली. मोफत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक आणि अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिलांनी याबाबत मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सण उत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.

प्रवासी, विद्यार्थी ताटकळत बसले एसटी बसस्थानकावर बसने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसह शाळा महाविद्यालयात लालपरीने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस आता आता येईल, याची प्रतीक्षा करत तासन् तास ताटकळत बसावे लागले

"एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरी त्यांच्या मागण्या रास्त आहेत. भाजपजन सत्तेत नसतात तेव्हा विलिनीकरणाच्या बाता करतात. सत्तेत असताना विलिनीकरण होऊ शकत नाही, अशी दुटप्पी भूमिका घेतात." - आ. अॅड. यशोमती ठाकूर

"गावाला जाण्यासाठी सकाळपासून डेपोत बसची वाट पाहत उभा आहे. बस नसल्याने गावाला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी."  - विजय काळे, प्रवासी

"विभागातील ८४३ फेऱ्यांपैकी ३६५ फेऱ्या कामगारांच्या संपामुळे रद्द कराव्या लागल्या. २३१२ कर्मचाऱ्यांपैकी संपात ४२६ कामगार सहभागी होते. मोर्शी व बडनेरा आगारामधून बस सुरू होत्या. या संपामुळे १७ कोटींहून अधिक महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले."- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक 

टॅग्स :ST Strikeएसटी संपAmravatiअमरावती