शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लालपरी धावली, मात्र प्रवाशाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्याने यातील ३ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

ठळक मुद्देमोर्शी आगारातून तीन बसफेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मार्च महिन्यापासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शुक्रवारी काही अटीवर सुरू करण्यात आल्या. परंतु प्रवासीच नसल्याने सकाळच्या सत्रात काही शेड्युल रद्द, तर एका फेरीविना प्रवास करावा लागल्याचा प्रसंग मोर्शी आगारावर ओढावला.लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्याने यातील ३ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. एक फेरी ज्या रस्त्याने अधिक प्रवासी असतात आशा चांदूर बाजार - परतवाडा मार्गावरील रिद्धपूर या गावाकरिता सोडण्यात आली, परंतु, या बसमध्येसुद्धा एकही प्रवासी नसल्याचे दिसून आले. मोर्शी आगारातून नऊ शेड्यूल सोडण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकाने घेतला होता. त्यापैकी चार शेड्यूल सकाळच्या सत्रात व पाच शेड्यूल दुपारच्या सत्रात सोडण्यात येणार होत्या. परंतु पहिल्याच सत्रात तीन बसेस रद्द करण्यात आल्याने उर्वरित शेड्यूलसुद्धा पूर्णत्वास जाईल की नाही, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. नियमित वेळेत मोर्शी आगारातून २८३ फेड़्या केल्या जातात. परंतु लॉकडाऊनचा काळ पाहता मोर्शी आगारातून फक्त नऊ शेड्यूल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले. याकरिता पहाटे आगारात गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंग रहावे, याकरिता फक्त दहा कर्मचारी कर्तव्यावर बोलाविण्यात आले होते. आगारातून बस नेताना वाहकाकडे सॅनिटायझर व मास्क दिले जातात. त्याचबरोबर प्रत्येक सीटवर एकच प्रवासी बसेल याची दक्षतासुद्धा घेण्याचे सांगितले आहे. बसमध्ये किमान २० प्रवासी असणे आवश्यक असून, ६५ वर्षांवरील नागरिक तसेच १० वर्षांच्या आतील मुलांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याने निवडक प्रवासी संख्या कमी राहिली.

टॅग्स :state transportएसटी