अमरावती : ग्राहक बनून आलेल्या चार बुरखाधारी महिलांनी सराफा बाजारातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल अर्धा किलो वजनाच्या सोनसाखळ्या लंपास केल्यात. या सोनसाखळ्यांची किंमत अंदाजे १४ लाख रूपये आहे. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजवरून खोलापुरीगेट पोलिसांनी तपासकार्य सुरु केले आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनुसार, कॅम्प परिसरातील जोशी कॉलनीतील रहिवासी रजनिश प्रकाशचंद कोठारी (४६) यांचे शहरातील सराफा बाजारात जे.पी.कोठारी ज्वेलर्स नामक सोन्या-चांदीच्या दागिनांचे प्रतिष्ठान आहे. आहे. शनिवारी सकाळी प्रतिष्ठान उघडताच चार बुरखाधारी महिला एका लहान बालकासोबत दुकानात आल्या. सोन्याची चेन खरेदी करायची आहे, असे त्यांनी संचालकांना सांगितले. बुरखाधारी महिलांची चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्या फुटेजवरून आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. जुन्या आरोपींचीही चौकशी करण्यात येत असून सर्व बाजूने तपासकार्य सुरु करण्यात आले आहे. -कुमार आगलावे, पोलीस निरीक्षक, खोलापुरीगेट ठाणे.
१४ लाखांच्या सोनसाखळ्या लंपास
By admin | Updated: March 16, 2015 00:13 IST