शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या पिकअपची ट्रकला भीषण धडक; पाच ठार, आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2023 22:43 IST

Amravati News मेळघाटातील धारणी तालुक्याला लागून असलेल्या अकोट परिसरातून काम करून गावी परतणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांच्या वाहनाला देढतलाई शेखपुरा येथे अपघात झाला.

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या देढतलाईजवळ अपघात

अमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्याला लागून असलेल्या अकोट परिसरातून काम करून गावी परतणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांच्या वाहनाला देढतलाई शेखपुरा येथे अपघात झाला. उसाचा ट्रक आणि पिकअप वाहन यांच्यात बुधवारी दुपारी २:३० वाजता ही भीषण धडक झाली. यात पाच मजूर ठार झाले, तर आठ गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १२ व १४ वर्षे वयाच्या मुलींचा समावेश आहे. अपघातातील सर्व मृत व जखमी हे मध्य प्रदेशातील सुंदरदेव येथील असल्याची माहिती खकनार पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली. तापी नदीजवळ झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, मजुरांनी भरलेले पिकअप वाहन चक्काचूर झाले.

पार्वती रामसिंग दिनकर (३२), नंदनी रामसिंग दिनकर (१२), दुर्गा कालू तंडीलकर (१४), रमेश मंगल (३५), जामवंती रमेश (३२, सर्व रा. सुंदरदेव, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. बसंती श्रीराम (४५), गणेश रामचंद्र (१०), दारासिंग श्रीराम (७), रवींद्र रमेश (१०), मुन्नीबाई रामचंद्र (४८), रामसिंग मोतीलाल (४०), कौशल्या श्रीकेश (१५), जगन कमल (१३), चंद्राबाई नानकराम (३५) अशी जखमींची नावे आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरात शेतीसह इतर कामांसाठी मध्य प्रदेशातील मजूर आले होते. काम आटोपल्याने बुधवारी त्यांना घेऊन पिकअप वाहन सुंदरदेवकडे जात होते. मध्य प्रदेशातील देडतलाई शेखपुराकडे जाणारा उसाचा ट्रक (एमपी ०९ - केडी १७२३) आणि पिकअप यांच्यात भीषण धडक झाली. नेपानगरच्या आमदार सुमित्रा कासदेकर, डॉ. राजेश कासदेकर, नगरसेवक इरफान कुरेशी, सचिन मंडलकर, रशीद खान यांनी घटनास्थळाहून रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल केले.

अपघातात पाच जण ठार झाले आहेत. आठ जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास खकनार पोलिस करीत आहेत.

- संजय पाठक, ठाणेदार, खकनार (मध्य प्रदेश)

 

टॅग्स :Accidentअपघात