अंजनगाव सुर्जी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पतंजली महिला योग समितीच्यावतीने कोविड-१९ संबंधी स्वॅबची तपासणी करणाऱ्या चमुचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पतंजली महिला योग समिती व लोकजागरच्या संगीता गोविंद मेन यांनी केले. या कार्यक्रमात कोरोनायोद्धा चमुला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन प्रमोद निपाणे यांनी केले.
कार्यक्रमाला नाना शिंदीजामेकर, देवानंद महल्ले, नीता मोगरे, छाया बागडे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात जया लहाने, यामिनी बोरेकर, डॉ. निकिता रोकडे, वैष्णवी गांधी, रुपाली केवाळे, चंद्रकांत पेढेकर, डॉ. प्रशांत कडू, दीपक रायबोले, नीलेश धुमाळे, महेश पारणकर, रीतेश बेयारिया, संदीप अंभोरे, अजय थेरे, शालू तायडे, जयश्री घटाळ, माधुरी गोळे, संगीता अभ्यंकर, रंजना कांबळे, अरुणा किरसान, अनुराधा प्रजापती या सर्वांना पंतजली व लोकजागरच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दीपा घाटे, अलका अंबुलकर यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला भूपेंद्र भेलांडे यांनी शुभेच्छा दिल्या.