शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कोल्हापूर, अमरावती विभाग विजेते

By admin | Updated: November 9, 2015 23:19 IST

राज्यस्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धा : कट्टा येथे पार पडले रोमहर्षक सामने

मालवण : कट्टा (ता. मालवण) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटातून कोल्हापूर संघाने पुणे संघाचा ६३-३८ अशी २५ गुणांनी मात करत विजेतेपदावर नाव कोरले. तर मुलींच्या गटात अमरावती संघाने कोल्हापूर संघाचा अवघ्या दोन गुणांनी पराभव करत विजयश्री संपादन केली. कोल्हापूर विरुद्ध अमरावती यांच्यात झालेला अंतिम सामना रोमहर्षक झाला.महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कट्टा येथील वराडकर हायस्कूल क्रीडांगणात १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धा ७ व ८ नोव्हेंबर या कालावधीत खेळविण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, अमरावती आणि नागपूर विभागातील राज्यभरातून सात संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत मुलांच्या गटातून द्वितीय पुणे व तृतीय मुंबई उपनगर तर मुलींच्या गटातून द्वितीय कोल्हापूर व तृतीय पुणे संघाची निवड करण्यात आली. सहभागी संघातील खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दादा मिठबावकर, चॉकबॉल असोसिएशनचे राज्य सचिव सुरेश गांधी, मुख्याध्यापक एम. व्ही. लिंकर, सचिव संजय पेंडुरकर, उपाध्यक्ष संजय नाईक, क्रीडा अधिकारी सचिन निकम, संस्था उपाध्यक्ष यशवंत भोजने, भाऊ खटावकर, शेखर पेणकर, एस. बी. गावडे, भूषण गावडे, प्रकाश कदम, राजन पेंडुरकर, एकनाथ राऊळ, बी. एम. वाजंत्री, सुभाष म्हाडगूत, अ‍ॅड. रुपेश परुळेकर, उदय वायंगणकर, बाबू टेंबुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिगरबाज : विवेक, शामलीची खेळीकोल्हापूर विभागाचा अष्टपैलू खेळाडू विवेक बंडगर याने कोल्हापूर संघातर्फे खेळताना जिगरबाज खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने ३५ हून अधिक गोल केले. त्याला प्रदीप कोळी, ओंकार पाटील, प्रसाद चव्हाण या खेळाडूंची साथ लाभली. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर पुणे संघाला २५ गुणांनी नमवले. मुलींच्या गटातून झालेल्या अंतिम सामन्यात शामली इंगळे व पायल जाधव यांनी नेत्रदीपक कामगिरी करत कोल्हापूर संघाला दोन गुणांनी पराभूत केले.मुलींचा अंतिम सामना ४७-४५ असा रंगतदार झाला. सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दादा मिठबावकर यांनी उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम देऊन गौरविले.