शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चाकुबाज सुसाट? पाच तरुण रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 00:08 IST

जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली, तर प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची एक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी येथील देशी दारू दुकानाजवळ घडली. सुनील साहू (५२) हे दारू दुकानात साफसफाई करताना एका दुचाकीहून तीन तरुण दारू पिण्यासाठी आले. तेथे त्यांनी मद्य घेतले. तेथे शिवीगाळ करत असताना सुनील साहू यांनी त्यांना हटकले. त्यातील एकाने साहू यांच्या पोटात चाकू भोसकला. त्यांनी आरडाओरड करताच ते तिघेही पळून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात चाकुबाज सुसाट सुटले की काय, अशी शंका यावी अशा चार ते पाच घटनांमध्ये चाकूने वार करण्यात आले. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्या दोन प्रकरणात हाफमर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले.राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोतीनगर भागात शिवाजी अब्रुक (३०, रा. मलकापूर) यांची दुचाकी अडवून मागे बसलेल्या सौरभ भेेंडे (२४, सरस्वतीनगर) व अतुल भिलकर (४०, वैशाली कॉलनी) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांंना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजी अब्रुक यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी अक्षय बाभूळकर (२५, वल्लभनगर) व अन्य दोन ते तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली, तर प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची एक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी येथील देशी दारू दुकानाजवळ घडली. सुनील साहू (५२) हे दारू दुकानात साफसफाई करताना एका दुचाकीहून तीन तरुण दारू पिण्यासाठी आले. तेथे त्यांनी मद्य घेतले. तेथे शिवीगाळ करत असताना सुनील साहू यांनी त्यांना हटकले. त्यातील एकाने साहू यांच्या पोटात चाकू भोसकला. त्यांनी आरडाओरड करताच ते तिघेही पळून गेले. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. गाडगेनगर पोलिसांनी २५ ते ३० वर्षे वयोगटातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मांडीत चाकू भोसकलानागपुरी गेट भागातील उस्माननगर येथे शेख इम्रान याच्या डाव्या पायाच्या मांडीवर चाकूने वार करण्यात आला. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. भावाला मारहाण करत असताना शेख इमान हा त्याला सोडवायला गेला असता आरोपी शेख वसीमने त्याच्यावर चाकू चालविला, तर फिर्यादी इर्शाद शहा याला देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  

रोहनखेड्यात करंगळीवर वारनांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहनखेडा पर्वतापूर येथील संदीप रायबोले (४०) यांच्याशी लोंबाझोंबी करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सूरज रायबोले हा वाद घालत असताना त्याच्या हातातील चाकू संदीपच्या मानेवर व करंगळीवर लागला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दोघेही दारू पित असताना हा प्रकार घडला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी