शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे : किरीट सोमैया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 18:16 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी सोमैया यांना म्हटले आहे. परंतु, सोमैया मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देकिरीट सोमैया यांच्या अमरावती दौऱ्यास मनाई

अमरावतीशहरात चार दिवसांपासून तणावाची स्थिती असल्याने शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या १७ तारखेच्या अमरावती दौऱ्यास पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी परवानगी नाकारली आहे. परंतु, सोमैया मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असं त्यांनी सांगितलं आहे.

शहरात १२ व १३ तारखेला दोन समाजात तेढ निर्माण निर्माण होऊन सामाजिक शांततेस बाधा निर्माण झालेली आहे. शांतता व सुव्यस्थेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरात जातीय तणाव वाढू नये याकरिता संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे बुधवारचा दौरा स्थगित करण्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी सोमवारी किरीट सोमय्या यांनी दिले आहे. 

अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात आली असून या सार्वजनिक शांततेस बाधा न येण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी सोमैया यांना म्हटले आहे.

पोलिसांची नोटीस मिळताच सोमैयांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. 'आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे' असे असे सौमैया ट्विटद्वारे म्हणाले. यासोबत त्यांनी पोलिसांची नोटीसही प्रसिद्ध केली. 

अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला, याला ठाकरे सरकारची मूक संमती होती, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला, मला अमरावतीकरांची व्यथा व स्थिती समजवून घ्यायची आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी दौऱ्यावर प्रतिबंध असल्याचे असल्याचे पत्र दिल्याचे सोमैया यांनी सांगितले. सोमैयांच्या ट्विटनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याTripuraत्रिपुराAmravatiअमरावती