शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

म्हशींची कत्तल गोवंश हत्या लपविण्यासाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:17 IST

शहरातील विशिष्ट भागात होणारी गोवंश हत्त्या लपविण्यासाठीच म्हशींच्या कत्तलखान्याचा घाट महापालिकेने रचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप : प्रस्तावित कत्तलखान्याला विरोध

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील विशिष्ट भागात होणारी गोवंश हत्त्या लपविण्यासाठीच म्हशींच्या कत्तलखान्याचा घाट महापालिकेने रचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने ट्रान्सपोर्टनगरस्थित कत्तलखान्याला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमिवर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाºयांसह भाजप नगरसेवकांनी सोमवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांची भेट घेतली. त्यावेळी हा आरोप करण्यात आला.कत्तलखान्याला १८ वर्षांनंतर मंजुरी या शीर्षकाने ‘लोकमत’ने एमपीसीबीने दिलेल्या परवानगीचा उहापोह केला होता. त्यापार्श्वभूमिवर विहिंपसह नगरसेवक व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिका प्रशासन व कत्तलखान्याविरुध्द आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात होणारी जनावरांच्या अनधिकृत कत्तलीवर नियंत्रण राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने म्हशींच्या कत्तलखान्याचा प्रस्ताव एमपीसीबीकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला काही अटीशर्ती टाकून परवानगी मिळाली.या संतभूमित आम्ही कत्तलखाना खपवून घेणार नाही. आमच्या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचवा, अशी मागणी विहिंपचे विजय शर्मा यांच्यासह नगरसेवक प्रणित सोनी, राधा कुरील, अजय सारस्कर, मिलिंद बांबल, संदीप वैद्य, महेश देवळे, अजितपाल मोंगा, मनोज गोयनका, पप्पू गगलानी, जितेंद्र जैन, अनिल किल्लेकर, मयुर सोनी, हेमेंद्र जोशी आर.बी अटल आदींनी केली. पशूंचे रक्त सांडवून आम्हाला शहराचा विकास नको, असे बजावत कत्तलखाना सुरू झाल्यास जनक्षोभ उफाळेल व त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला.शहरात कत्तलखाना का नको, याबाबत विविध दाखले आणि न्यायालयीन संदर्भ देण्यात आले. शहरात कत्तलखाना नकोच, असा प्रस्ताव नगसेवकांकडून येत्या आमसभेत टाकण्यात येईल, अशी माहिती उपस्थित नगरसेवकांनी दिली.यंत्रणा पॉवरफुल करा ना !संतभूमित कत्तलखाना उभारण्याऐवजी ज्या भागत राजरोसपणे गोह्त्या व अन्य पशूंची कत्तल केली जाते, ते थांबविण्यासाठी पथके नेमा, यंत्रणा पॉवरफुल करा, असा सल्ला यावेळी महापालिका प्रशासनाला देण्यात आला. स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी आणि राजरोसपणे होणाºया गोहत्या दडपविण्यासाठीच कत्तलखान्याचे समर्थन केले जात असल्याचा पुनरुच्चार या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख आणि सहायक पशुशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी मोर्चा सांभाळला.