शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

किडनीदानातून वडिलांनी दिली मुलाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:11 IST

मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या तरुण मुलाला वडिलांनी किडनीदान करून मृत्यूच्या दारातून खेचून जीवदान दिले. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटीमध्ये प्रत्यारोपण : सहावी यशस्वी शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या तरुण मुलाला वडिलांनी किडनीदान करून मृत्यूच्या दारातून खेचून जीवदान दिले. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. अलीकडच्या काळातील विभागातील ही सहावी यशस्वी शस्त्रक्रिया आहे.स्थानिक पवननगर येथील रहिवासी वैभव रुमाकांत खैरकर (२६) हा चार वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. तो १० महिन्यांपासून सुपर स्पेशालिटीमध्ये नियमित डायलिसिस घेत होता. वैभवचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामसुंदर निकम, विशेष कार्य अधिकारी डॉ. टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. रुमाकांत आत्माराम खैरकर (५५) हे किडनी देण्यास योग्य असल्याचे विविध चाचण्याअंती निष्पन्न झाले. त्यांनी पुत्रप्रेमापोटी किडनीदानाला लगेच होकार दिला. त्यानंतर नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ यूरोलॉजिस्ट डॉ.संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ.निशांत बावनकुळे, यूरोसर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. निखिल बडनेरकर, डॉ. विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, डॉ. राजेश कस्तुरे, डॉ. रामप्रसाद चव्हाण, डॉ. प्रणीत घोनमोडे, डॉ. रवि भूषण, डॉ. विजय सोनपरोते, डॉ. अभिजित दिवेकर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. कायदेशीर प्रक्रियेकरिता डॉ. सोनाली चौधरी, नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांनी मोलाची भूमिका पार पडली.आर्थिक परिस्थिती बेताचीरुमाकांत खैरकर यांचे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वैभववरील उपचारासाठी अनेक खस्ता खाव्या लागल्या. प्लास्टिकचे छोटेसे दुकान चालविणाऱ्या रुमाकांत यांच्यावर प्लास्टिकबंदीने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. त्यांच्यासमोर वैभवच्या औषधोपचारासाठी लागणाºया खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्यावर मात करत वैभवला नवजीवन दिले.वैभव खैरकर हा सातवीत असताना त्याच्या आईचे अर्थात रुमाकांत खैरकर यांच्या पत्नीचे निधन झाले. चौदा-पंधरा वर्षांपासून रुमाकांत हेच आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत. त्यांनीच आईच्या प्रेमाला पारखा झालेल्या वैभवचे पालनपोषण केले. तोच वैभव अंथरुणाला खिळल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कुठलाही किंतु-परंतु न बाळगता त्यांनी वैभवला किडनी दिली.