लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना शनिवारी राजापेठ व कोतवाली हद्दीत उघडकीस आली. राजापेठ पोलिसांनी एका संशयितावर, तर कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.राजापेठ हद्दीतील एक १७ वर्षीय मुलगी व आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी असून, १५ मार्च रोजी संशयित अल्पवयीन आरोपीने मुलीला पळवून नेल्याचा आरोप एका महिलेने शनिवारी दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्याचप्रमाणे कोतवाली हद्दीतील रहिवासी १६ वर्षीय मुलगी २२ मार्च रोजी भूगोलचा पेपर देण्यासाठी श्यामचौक शाळेत गेली. दुपारी १ वाजता पेपर दिल्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाईन असणारा टॉप, निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट, निळ्या रंगाचा स्कार्प, हातात खाकी रंगाची पर्स, जिन्स कपड्याचे स्कूल बॅग, पायात काळी जुती, उंची ५ फूट, सडपातळ बांधा, केस पाठीपर्यंत लांब असे त्या मुलीचे वर्णन आहे. तिला अज्ञात आरोपीने फुस लावून पळविल्याचा संशय कुटुंबीयांनी शनिवारी कोतवाली ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला.
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:41 IST